Home » माझी वडवणी » केड़गाव प्रकरण आरोपीला फाशी द्या– विनायक मुळे. 

केड़गाव प्रकरण आरोपीला फाशी द्या– विनायक मुळे. 

 केड़गाव प्रकरण आरोपीला फाशी द्या– विनायक मुळे. 
शिवसेनेचे पोलीसांना निवेदन 
 डोंगरचा राजा ऑनलाईन
अहमदनगर जिल्हातील केड़गाव येथील व शावसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकाची निर्भय पणे गोळ्या घालुन  7 एप्रिल रोजी  हत्या करण्यात आली. या हत्ताचे तीव्र पडसाद वड़वणीत उमटले असुन आज वड़वणीत शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे यांच्या नेत्तत्वा खाली शिवसैनिकांनी तिव्र आंदोलन छेड़त वड़वणी पोलीस स्टेशनला निवेदन देत हल्ले खोरावर कठोर कार्यवाही करत फाशी ची शिक्षा देण्याची मागणी केले.
या सदर्भात बोलतांना ते म्हणाले की. भाजपा सरकारचा  काळ हा मोगलाई पेक्षा ही कर्दनकाळ ठरला. शिवसैनीक हाताखाली येत नसल्याचे पाहुन ह्या सरकारणे गूंड़ाच्या माध्यमातून शिवसैनिक संपविण्याचा निर्धार केला असुन याचे ज्वलंत उदाहरण म्हणचे केड़गाव येथील शिवसिनिकाची हत्त्या होय.भाजपा सरकारच्या पापांचा राजंण भरला आहे. शिवसैनीक कालही वाघ होते. आजही आहेत आणी उद्या ही रहाणार आहेत. आमच्या नादि लागु नका आम्ही शिवसैनीक बाळासाहेबाच्या तालमीतले आहोत. भाजपा सरकारने तात्काळ केड़गाव येथील शिवसैनीकावर हल्ला करणार्या आरोपीला शोधुन फासी ची शिक्षा देण्याचे काम करवे. नसता शिवसेनेचे संपर्कं मंत्री रामदासभाई कदम. संपर्कं प्रमुख सुधीरजी मोरे साहेब. जिल्हा प्रमुख सचिनभैय्या मुळुक. माजी जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप. यांच्या आदेशाने शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे यांच्या नेत्तत्वा खाली वड़वणी तालुक्यातील सर्व शिवसैनिक वड़वणीतच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात  राण पेटविणार असल्याचे निवेदन  वड़वणी पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी. बंड़ुमामा जाधव. युवराज शिंदे. नागेश ड़िगे. बाळासाहेब लोकरे. मुन्ना पवार. औमराजे जाधव. भय्यासाहेब खोसे. प्रकाश जोशी. रोहीत जाधव. भागवत वाघमारे अशोक ढगे. सह शिवसेना. युवासेना. किसान सेना. महिला आघाडी व शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संस्थेने उपस्थीत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.