Home » माझा बीड जिल्हा » शिक्षण क्रांती होणे नितांत गरजेचे – कदम

शिक्षण क्रांती होणे नितांत गरजेचे – कदम

शिक्षण क्रांती होणे नितांत गरजेचे – कदम

बीड / डोंगरचा राजा आँनलाईन

विषमतावादी सरकामुळे बहूजन समाजाची शैक्षणिक स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. त्यांच्या शैक्षणिकतेच्या प्रमाणात डोकावून पाहिले तर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभा राहिलेली आहेत. त्यामुळे बहूजन वर्गाने आतातरी वेळीच सावज होणे गरजेचे आहे. कारण खाजगीकरणामुळे बहूजन विद्यार्थ्यांचे वाटोळे होत आहे. त्यामुळे आता शिक्षण क्रांती होणे नितांत गरजेचे आहे असे उद्गार आंबेडकरी मिशनचे दिपक कदम यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शनिवार (दि.7) रोजी आयोजित केलेल्या व्यख्यान मालेत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष म्हणून डेप्युटी सीईओ मधुकर वासनिक तर प्रमुख पाहूणे म्हणून आगारप्रमुख शिवराज कराड, पीआय गजानन जाधव, एपीआय आनंद झाटे, पीआय लाकाळ, इंजि. वचिष्ट तावरे यांची उपस्थिती होती.
उपस्थित आंबेडकरी जनतेस संबोधित करताना दिपक कदम म्हणाले की, पहिली शिक्षण क्रांती बौध्द काळामध्ये झाली. यात प्रामुख्याने भारत देशात जगभरातले विद्यार्थी शिक्षणासाठी तक्षशिला विश्‍वविद्यालय, नालंदा विश्‍वविद्यालय याठिकाणी येत असत. परंतू पुढे मनुवाद्याने शिक्षणक्रांतीला प्रतिक्रांतीत आणून ठेवले. त्यामुळे शिक्षणाचे वाटोळे झाले. त्यानंतर माणूस असुनही माणसासारखे वागविले जात नव्हते. परंतू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आपण माणसात आलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश दिलेला आहे. परंतु आजघडीला समाजाची काय परिस्थिती आहे, याकडे समाजाने गांर्गीयाने घेतले पाहिजे. बुध्दीजीवी वर्गाने याकडे गांर्गीयाने घेतले नाही तर उद्याची सुशिक्षित पिढी आपल्याला कधीही माप करणार नाही. ज्या शिक्षणामुळे आपल्या कुळांचा उध्दार होणार आहे, त्या शिक्षणाचे दिवसेंदिवस खाजगीकरण होवू लागले आहे. त्यामुळे बहूजन समाजातील युवकांपुढे शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. तसे पाहिले तर सध्यस्थितही बहूजन विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचे अनेक आव्हाने आवासून उभा राहिलेली आहेत. त्यामुळे बहुजन समाजाने आता शिक्षण क्रांतीसाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे उद्गार दिपक कदम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.मनोहर सिरसट यांनी तर सुत्रसंचालन दिगांबर गंगाधरे आभार भास्कर सरपते यांनी मानले. या व्याख्यान मालेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच व्याख्यानमाला समितीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.