भाजपा- सेना एकत्र आल्यास मी युतीतून बाहेर: राणे
डोंगरचा राजा आँनलाईन
भाजपाने शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला असतानाच नारायण राणे यांनी भाजपाला इशारा दिला आहे. भाजपा- शिवसेनेची युती झाली तर मी युतीत नसेन. मी युतीतून बाहेर पडणार, असा इशाराच नारायण राणेंनी दिला आहे. राज्यात भाजपाने ठरवले तर त्यांची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
नारायण राणे यांनी एका कार्यक्रमात भाजपा, शिवसेना व सद्य राजकीय स्थितीबाबत भाष्य केले. शिवसेना- भाजपा युतीविषयी ते म्हणाले, भाजपाच्या मंत्रिमंडळात मी गेलो तर शिवसेना सत्ता सोडणार होती. त्यांना इतकं असेल तर ते युतीत आले तर मी देखील युतीत राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेना माझा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने कोणाशी युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे. पक्ष स्वबळावर येणार नाही हे जाणवल्यास युती केली जाते. पण राज्यात भाजपाने ठरवले तर त्यांची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी मोठे होतायेत. पण त्यासाठी वेळ लागेल, असेही ते म्हणालेत.