फुले,आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर.
माजलगांव / रविकांत उघडे
माजलगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघा च्या शाखा.माजलगावच्या वतीने नेहमीच सामाजिक स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपण ही समाजाचं काही देणं लागतो हा उद्देश समोर ठेऊन मागील पाच वर्षांपासून सातत्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.
प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने दि.11 वार.बुधवार रोजी नवीन बसस्थानक परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिराच्या उद्घाटक म्हणून माजलगाव उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियांका पवार मॅडम ह्या उपस्थित राहणार आहेत.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजलगाव पोलीस उपविभागाच्या साहाय्यक पोलिस अधीक्षक मा.भाग्यश्री नवटक्के मॅडम उपस्थित राहणार आहेत.तर या रक्तदान शिबिराचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी धाईजे सर हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून
गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, गटशिक्षण अधिकारी बी.के.नांदुरकर,डॉ.यशवंत राजेभोसले,डॉ.प्रवीण राठोड, एस टी.चे आगार प्रमुख डोके, ज्येष्ठ मार्गदर्शक बी.वाय.उघडे सर, ए.एस.पोटभरे सर,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यु.के.जोगदंड सर,जिल्हा सचिव एस. एच.भालेराव सर,बी.डी. सेवानिवृत्तकेंद्रप्रमुख बचुटे सर यांची उपस्थिती राहणार आहे.या शिबिरात रक्तदात्याला रक्त चाचणी चे सर्व रिपोर्ट्स व प्रमाणपत्र देण्यात येईल.असी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघच्या वतीने देण्यात आली आहे.