चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद
फुले-आंबेडकर सार्वजनिक जयंती चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्द प्रतिसाद.
इंग्लिश ,मराठी शाळेतून 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग.
माजलगाव / रविकांत उघडे
फुले आंबेडकर सार्वजनिक जन्मोत्सवच्या वतीने आज सकाळी 8:30 वाजता कै. सुंदरराव सोळंके महाविद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील इंग्लिश, मराठी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्त्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे उदघाटन फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुहास बोराडे,संपादक-pn marathi, पी एस जाधव सर,प्रा. संजय बागुल
झोडगे सर, बनसोडे सर, कोरडे सर, सोनवणे सर, पेंटावार सर,सिध्दार्थ ससाणे, नितीन जावळे, नागरगोजे सर, इत्यादीनी मान्यवरांनी व पालकांनी पुष्प अर्पण केले. पुढे काही वेळेत 1ली ते 4 थी या गटाला फुलपाखरू ,हे चित्र रस रंग भरणा करण्यास दिले., नंतर 5 ते 8 वी वृक्षारोपण चे चित्र होते, आणि 8 वी ते 10 वी दुष्काळ या विषयाचे चित्र ,व खुला गट चवदार तळ्यांचे चित्र, अशा विविध गटांची स्पर्धा आयोजित होती. पहिल्या गटाला, 3 हजाराचे बक्षीस, दुसऱ्या गटाला 2 हजाराचे बक्षीस, व तिसऱ्या गटाला 1हजार अशी बक्षिसाची वर्गवारी करण्यात आली होती. विद्यार्थी सकाळी सकाळी कॉलेज मध्ये येऊन थांबले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना मनपसंद रंग पेटी भेटल्या नाहीत. सकाळी लवकर दुकान उघडे नसल्यानी पालकांना दुकानाची शोधा शोध करावी लागली.चित्रकला स्पर्धे दरम्यान पाण्याची सोय करण्यात आली होती. एकूण 5 हॉल मध्ये 1200 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवला. प्रा संजय बागुल सर यांच्या नियोजनामुळे चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.