Home » माझा बीड जिल्हा » संविधानाने जगण्याचा अधिकार दिला

संविधानाने जगण्याचा अधिकार दिला

संविधानाने जगण्याचा अधिकार दिला
प्रा.संदिप कदम यांचे प्रतिपादन
बीड,दि.7(प्रतिनिधी):- एकेकाळी माणसाला माणुस असूनही जगण्याचा अधिकार नव्हता. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशातल्या प्रत्येक माणसाला समान हक्क आणि जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे प्रतिपादन प्रा.संदिप कदम यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शुक्रवार (दि.6) रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित केलेल्या व्याख्यान मालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी बी.बी.जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शशीकांत दहिफळकर , निवृत्ती डोके, अशोक ठाकरे, नितीन बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितीत जनसमुदायाला स्वराज्य व संविधान राज्य, अनुयायांची ध्येयप्राप्ती आणि जबाबदारी या विषयावर संबोधित करतांना प्रा.संदिप कदम म्हणाले की, आज घडीला देशामध्ये सामाजिक सलोखा पुर्णत: बिघडला आहे.त्यामुळे एक संवेदनशील नागरिक म्हणून प्रत्येकाने समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम अबाधित ठेवण्याकरिता पाऊले उचलली पाहिजेत. कारण ही भुमि साध्या माणसांची नसून ती थोर महापुरुषांची आणि संतांची आहे. परंतू या भुमित विषमतावादी लोकांनी आक्रमणे केली आहेत. त्यामुळे समतेचा इतिहास नाहिसा होतो आहे. अशी विपुल परिस्थिती आजघडीला निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातल्या बहुजन वर्गाने जागृत राहणे गरजेचे होवून बसले आहे. मानवतेचा संघर्ष करणार्‍या भुमित जाती-जातीत तंटे लावली जात आहेत. विषमतावादाचे विष पेरणार्‍या विशिष्ठ वर्गाला ही तंटे अपेक्षित आहेत. त्यामुळे बहूजन वर्गाने विषमतावाद्यांची कुटनिती लक्षात घेतली पाहिजे. ज्या संविधानावर हा देश उभा आहे, त्याच संविधानाला काही लोक नाहिसे करण्याच्या हालचाली करू लागले आहेत. त्यामुळे बहुजन युवकांनी या विषमतावादी लोकांचा डाव वेळीच हाणून पाडण्याची गरज निर्माण झाली आहे. बहूजन वर्गाने जर संविधानापुढील धोके वेळीच ओळखले नाही तर आगामी काळात याचे परिणाम भोगण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही असे वास्तवादी मत प्रा.संदिप कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंजि. बी.डी.साळवे, तर सुत्रसंचालन प्रा.विनोद किर्दक, आभार पंडित मुने यांनी मानले. हा व्याख्यान मालेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच व्याख्यानमाला समितीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
चौकट
रविवारी होणार हे कार्यक्रम
तुलसी इंग्लिश स्कुल येथे सकाळी 9 वाजता महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा तर 11 वाजता आंबेडकर भवन येथे भिमगीत गायन स्पर्धा, सायं.6.30 वाजता शब्बीर अन्सारी यांचे ओबीसी समाजाचा विकास फुले, शहू, आंबेडकरी विचारात आहे या विषयावर व्याख्यान होणार आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published.