Home » माझा बीड जिल्हा » बीडमध्ये तीन तलाक विधेयकाचा निषेध

बीडमध्ये तीन तलाक विधेयकाचा निषेध

 

बीडमध्ये तीन तलाक विधेयकाचा निषेध

डोंगरचा राजा आँनलाईन 

बीडमध्ये तीन तलाक विधेयकाचा निषेध;आम सभेनंतर सात महिलांकडून प्रशासनाला निवेदन

घोषवाक्यांच्या फलकांनी वेधले लक्ष;

आम सभेनंतर सात महिलांकडून प्रशासनाला निवेदन

‘इस्लामी शरियत हमारा गर्व है’;हुकुमत अपना काम करे, इस्लाम को ना बदनाम करे!

बीड, :- ‘हुकूमत अपना काम करे, इस्लाम को ना बदनाम करे’‘वापस लो, तीन तलाक बिल वापस लो’,‘शरियत हमारी पहचान है’ असे विविध घोषवाक्य असलेले नामफलक हाती घेऊन घराबाहेर पडलेल्या हजारो मुस्लिम महिला भगिनींनी आडत मार्केटजवळील मैदानावर आज एकत्र आल्या होत्या. यावेळी झालेल्या आम सभेत उपस्थित ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या सदस्या आणि येथील महिलांनी ‘इस्लामी शरियत हमारा गर्व है’ असे ठणकावून सांगत शरियतमधील हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचा ईशारा दिला. सात महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.
बीड येथील आडत मार्केट जवळील मैदानावर आज दुपारी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड समाज सुधार कमिटीच्यावतीने तीन तलाकच्या विरोधात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर परभणी येथील महिला विंगच्या आलेमा वोशेखुल हदीस सिद्दीकाबाजी, औरंगाबाद येथील फिरदोस फातेमा यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी बीड येथील सदस्या खान सबिहाबाजी होत्या तर व्यासपीठावर आफरीनबाजी उपस्थित होत्या. यावेळी मुस्लिम समाजातील महिला आणि मुली हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन या आमसभेची तयारी सुरु असल्याने सकाळपासुनच मुस्लिम समाजातील महिला आणि युवती मोठ्या संख्येने मैदानात दाखल होत होत्या. ‘शरियत हमारी पहचान है’, ‘हुकूमत अपना काम करे, इस्लाम को ना बदनाम करे’‘वापस लो, तीन तलाक बिल वापस लो’, ‘राष्ट्रपती के भाषण की हम निंदा करता है’ असे विविध घोषवाक्य असलेले फलक सभास्थळी उपस्थित महिला आणि युवतींच्या हातामध्ये होते. यावेळी फिरदोस फातेमा रमजान खान, महेजबीन अब्दुल बाकी, अनम इमरोज मोहंम्मद जावेद अली, नसरीन बेगम नुसरत अली, शेख आफरीन मुख्तार, काझी वसीया तकविम काझी मकबुल, मिर्झा रजिया सलीम बेग या सात महिलांनी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, तीन तलाक विधेयक घटना विरोधी तसेच महिला व बालकल्याण विरोधी आहे. विधेयक तयार करतांना कोणत्याही मुस्लिम धर्मगुरु किंवा विचारवंतांशी चर्चा करण्यात आलेली नाही. सदरील विधेयकावर पुनर्विचार करुन ते त्वरीत परत घेण्यात यावे, दोन्ही सभागृहातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणात मुस्लिम महिलांसंबंधी अपमानास्पद शब्दांचा वापर झालेला असुन सदरील आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्या भाषणातून वगळण्यात यावे, मुस्लिम महिलांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य व अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नये अशी मागणी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सात महिला प्रशासनाला निवेदन देवून परतल्यानंतर सभास्थळी सामुहिक दुवाने आमसभेचा समारोप झाला.
शेकडो रिक्षांची सोय
बीडच्या आडतमार्केट जवळील आमसभा संपल्यानंतर आपआपल्या घराकडे परतणार्‍या महिलांसाठी शेकडो रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक भागातील रिक्षा चालकांनी स्वत:हून यामध्ये सहभाग नोंदवत महिलांना मोफत घरापर्यंत सोडण्याची सोय केली.
नियोजनात महिला तर स्वयंसेवक म्हणून मुली
शासनाच्या तीन तलाक विधेयकाचा निषेध नोंदविण्यासाठी आयोजित मुस्लिम महिलांच्या आमसभेचे नियोजन महिलांनीच स्वत:हून केले होते. व्यासपीठासह समोरील पेंन्डालमध्येही सर्वत्र बुरख्यातील महिलाच दिसत होत्या. पत्रकार परिषदेपासुन निवेदन देण्यापर्यंत सर्व नियोजनात महिलाच पुढे होत्या. सभास्थळी अन्य व्यवस्थाही महिलांनी केली तर उपस्थित महिलांना पाणी वाटपाचे काम मुलीनीं केले.

आमसभेनंतर स्वच्छता मोहिम
महिलांची आमसभा झाल्यानंतर मुस्लिम समाजातील स्वयंसेवकांनी स्वत: पुढे येत आमसभा परिसरासह अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांसह इतर कचरा गोळा करुन स्वच्छता मोहिम राबवली.

Leave a Reply

Your email address will not be published.