Home » ब्रेकिंग न्यूज » *बसस्थानकासाठी कोट्यावधीचा निधी*

*बसस्थानकासाठी कोट्यावधीचा निधी*

*बसस्थानकासाठी कोट्यावधीचा निधी*
डोंगरचा राजा आँनलाईन
“”””””””””””””””””””
अंबाजोगाई, नेकनुर, आष्टी, पाटोदा, कडा बसस्थानकांच्या
नुतनीकरणासाठी 6.50 कोटी रुपायांचा निधी मंजुर.
पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नातून होणार बस स्थानके चकाचक.
बीड. प्रतिनिधी. सर्वसामन्य जनतेला प्रवास सुखकर व्हावा, ज्या बस स्थानकांमधून दररोज हजारो नागरकी प्रवास करतात अशा बसस्थानकांची दुरावस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी आणि नुतनीकरणासाठी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले होते. या प्रस्तावांना सरकारने मान्यता दिली असून अंबाजोगाई, नेकनुर, आष्टी, पाटोदा, कडा या बसस्थानकांच्या नुतनीकरणासाठी तब्बल साडे सहा कोटी रुपायांचा निधी मंजुर झाला असून ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्हयातील बसस्थानके आता चकाचक होणार आहेत.
बीड जिल्हयातील बसस्थानकांची दुरावस्था झाल्याचे अनेकदा राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे निवेदन प्राप्त झाले होते. या संदर्भात त्यांनी तातडीने लक्ष घालून दुरावस्था झालेल्या बसस्थानकांचे प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते. याची शासनाने दखल घेत जिल्हयातील पाच बस स्थानकांच्या नुतनीकरणासाठी साडे सहा कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्यातील 23 बसस्थानकांना बत्तीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ना.पंकजाताई मुडे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हयातील पाच बस स्थानकांना निधी प्राप्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षे बसस्थानके यांची दुरुस्ती न झाल्याने बिकट अवस्था झाली होती. कर्मचार्‍यासोबतच प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. हि अडचण जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी दुर केली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. अंबाजोगाई बसस्थानकांचे नुतनीकरणासाठी 2.50 कोटी रु.,नेकनूर बसस्थानक पुर्नबांधणीसाठी 1 कोटी रु., आष्टी बसस्थानकांचे डांबरीकरण व नुतनीकरणासाठी 1 कोटी रु., पाटोदा बसस्थानकांचे डांबरीकरण व नुतनीकरणासाठी 1 कोटी रु. आणि कडा बसस्थानकांचे डंाबरीकरण व नुतनीकरणासाठी 1 कोटी रु. अशा तब्बल 6.50 कोटी रुपायांचा निधी मिळणार असून बीड वासियांच्या अनेक अडचणी यातून सुटणार आहेत. त्यांनी दिलेल्या या निधीमुळे समाधान व्यक्त केले जात असून लवकरच जिल्हयातील बसस्थानके चकाचक होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.