Home » महाराष्ट्र माझा » पत्रकार कल्याण निधीला लाखाची मदत

पत्रकार कल्याण निधीला लाखाची मदत

पत्रकार कल्याण निधीला लाखाची मदत

बीड/ डोंगरचा राजा आँनलाईन

जिल्हयातील पत्रकरांवर येणार्‍या संकटांना तोंड देण्यासाठी व तातडीची मदत व्हावी या उद्देशाने मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने व जिल्ह्यातील संपादक, पत्रकारांना सोबत घेवून स्थापन केलेल्या पत्रकार कल्याण निधीसाठी बीड विधानसभेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर यांनी एक लाख रूपयांची मदत दिली आहे. आ. क्षीरसागर यांनी केलेल्या मदतीबद्दल परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
जिल्ह्यातील पत्रकारांवर येणार्‍या संकटांना तोंड देण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख व जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य व संपादक यांनी पत्रकारांसाठी कोष निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार पत्रकार कल्याण निधी या नावाने स्वातंत्र खाते काढण्यात आले असून जमा होणार्‍या निधीमधून पत्रकारांना मदत केली जाणार आहे. मागील आठवड्यात परिषदेचे शिष्टमंडळ पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची भेट घेवून पत्रकार कल्याण निधी संदर्भात माहिती एस.एम.देशमुख व पदाधिकारी यांनी दिली. यावेळी सर्वांनीच मोकळ्या मनाने मदत करण्याचे जाहिर केले. शनिवारी दि. 7 एप्रिल रोजी आ. जयदत्‍त क्षीरसागर यांनी पत्रकार कल्याण निधीसाठी एक लाख रूपये देण्याचे जाहिर केले. केवळ जाहिर केले नाही तर ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी जेष्ठ संपादक राजेंद्र आगवान, नरेंद्र कांकरिया, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, बालाजी मारगुडे, उत्तम हजारे, व्यंकटेश वैष्णव, मंगेश निटूरकर, संदिप बेदरे, रवि ऊबाळे, प्रशांत लव्हूरीकर, लक्ष्मण नरनाळे आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.