Home » राजकारण » युवकांचा जगताप मित्र मंडळात जाहीर प्रवेश

युवकांचा जगताप मित्र मंडळात जाहीर प्रवेश

युवकांचा जगताप मित्र मंडळात जाहीर प्रवेश
आँनलाईन डोंगरचा राजा /  धारूर
धारूर तालुक्यातील   चोरंबा आणी काटेवाडी येथील युवकांनी आज छत्रपती सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनराव जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.
   यावेळी जेष्ठ नेते अच्युतराव लाटे,सुरेश काका एरंडे,जीवन जगताप,कृषी ऊ. बाजार समिती चे संचालक संतोषराव यादव,नगरसेवक शरद यादव,दिलीप घुबड़े,अतुल चव्हाण,अतुलराव सोळंके,राजेश स्वामी,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष हितेंद्र काळे, आदी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना मोहनराव जगताप म्हणाले की युवकांनी जनतेच्या कामासाठी सक्रिय पणे काम करावे.मी सदैव आपल्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.आगामी काळात स्वाभिमानी युवकांची मोट बांधून पुढील राजकीय वाटचाल करणार आहे. तरुणांनी विधायक कामे हाती घेऊन गावकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत.यावेळी चोरंबा येथील चंद्रकांत देवकुले,संजय इरमले,विलास सुरवसे,अशोक भालेराव,अनंत गिरी,दयानंद भालेराव,अमोल भालेराव,बालाजी जाधव तसेच काटेवाडी येथील रामराव हजारे,विकास गोरे,संजय गोरे,विट्ठल हजारे,मोहन हजारे,रामराव मुंडे,बिभीषन हजारे,मकरध्वज हजारे,अनंतराव तिड़के,मछिन्द्र,हजारे
यांनी प्रवेश केला यावेळी सर्वांचे हार शाल देऊन मोहनराव जगताप यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.