Home » माझा बीड जिल्हा »  जयंती महोत्सव शांततेत पार पाडावा- श्रीधर 

 जयंती महोत्सव शांततेत पार पाडावा- श्रीधर 

 जयंती महोत्सव शांततेत पार पाडावा- श्रीधर 
डोंगरचा राजा आँनलाईन / रविकांत उघडे
शहरात सार्वजनिक फुले – अांबेडकर जयंतीनिमित्त आज दि.६ रोजी  शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती.  या शांतता कमिटीच्या  बैठकीचे अध्यक्ष जि.पो.अध्यक्ष जि.श्रीधर हे होते.तर यावेळी  उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियंका पवार, सहाय्यक पोलिस अधीक्षक  श्रीमती भाग्यश्री नवटक्के, उप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे,बहुजन विकास मोर्चा चे अध्यक्ष तथा सार्वजनिक जयंती महोत्सवाचे सचिव बाबुराव पोटभरे,तहसिलदार एन.जि.झंपलवाड  हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी  श्रीमती भाग्यश्री नवटक्के म्हणाल्या कि, जयंतीनिमित्त पोलिसांकडून पुर्ण पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करु.तसेच सोशलनेटवर्कवर सुध्दा नियंत्रण ठेवण्यात येईल. सुज्ञ नागरिकांनि अवैध धंद्याबाबत पोलिसांना माहिती द्यावि.असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले तर उपविभागीय अधिकारी श्रीमती.प्रियांका पवार, यांनी सार्वजनिक जयंती साजरी होत असल्याने महसूल विभागाने व नगर पालिका व इतर सर्व विभाग यांना लवकर या बाबत उपाय योजना करण्यात  याव्या असे आदेश दिले आहेत.व नागरिकांनी पण महसूल प्रशासनाला  सहकार्य करावे .या जयंती त योग्य  नियंत्रण राहण्यास मदत होईल.महसुल प्रशासन सदैव नागरिकांचे सेवेत.तत्पर आहे असे सांगितले.
 तर अजित बोर्‍हाडे(अप्पर पोलिस अध्यक्षिक,अंबाजोगाई ),यांनी महिला व मुलिंचे बाबत काळजि घेऊ.डिजे व इतर वाद्य कमी आवाजात ठेवन्याचे  आव्हाहन केले.
या बैठकीला संबोधित करताना बाबुराव पोटभरे,यांनी सार्वजनिक जयंतीनिमित्त पोलिसांकडून बंदोबस्त चोख ठेवावा.आंबेडकर चौकात डॉ.आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात येतो त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा.आम्ही राजकिय विरोधकांना एकत्र आणुन हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आणले आहे.व त्याच बरोबर जयंती विषयी माहिती दिली. या शांतता कमिटी च्या बैठकीचे अध्यक्षीय भाषण करताना पोलिस अधीक्षक मा.जि.श्रिधर,यांनी गैरहजर अधिकार्‍यांचि जिल्हा अधिकारी बीड यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे सुनावले व तसेच नगर पालिका चे कुणी जिम्मेदार अधिकारी उपस्थित नसल्याने या बाबत आपली नाराजी व्यक्त केली.त्याच बरोबर सर्व ज्येष्ठ  नागरिकांनि तरुणांवर नियंत्रण ठेवुन पोलिस प्रशासनाला मदत करावी.जयंती कार्यक्रमाला ज्यादा महिला पोलिस पथक ठेवण्यात येईल.सोशल नेटवर्कवर नियंत्रण ठेवले जाईल.जिल्ह्यांत २८ पोलिस ठाणे आहेत .त्यामध्ये २हजार कर्मचारी कार्यरत आहेत.हा जन्मोत्सव सर्वांनि एकत्र येवुन साजरा करावा असे नागरिकांना आव्हाहन केले.या वेळी मान्यवरांच्या हस्ते फुले आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवाचे पोस्टर विमोचन करण्यात आले.
 पोलीस निरीक्षक मोरे अार.आर.यांनी अ‍ाभार मानले.यावेळी शहरातील सर्व समाजातील नागरिक ,पत्रकार  व इतर मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.