अजित पवारांचा पुतळा जाळला
*शिवसेने बद्दल अपशब्द वापरल्यामुळे… बीड जिल्हा शिवसेने च्या वतीने जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या आदेशाने परळी येथे अजित पवारांचा पुतळा जाळुन निषेध*….
परळी वै (प्रतिनिधी) कोल्हापूर येथील हल्ला बोल सभेत शिवसेने बद्दल अपशब्दात टीका केल्या मुळे शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या आदेशावरून परळी शिवसेनेच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
परळी वै येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे दु १ वा शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके शहर प्रमुख राजेश विभूते, युवासेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन अजित पवार यांनी कोल्हापूर येथील हल्लाबोल सभेत शिवसेने बद्दल अपशब्दात टीका केल्याच्या निषेधार्त घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला चप्पल ने बडवून दहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजभैया पांडे, प्रा अतुल दुबे, उपशहर प्रमुख अभिजित धाकपडे, मोहन राजमाने, वैजनाथ माने युवा सेना शहर समन्वयक संतोष चौधरी, अनिल शिंदे, कृष्णा सुरवसे, गोविंद जंगले, ओम लोखंडे, अजय सुरवसे, सुदर्शन यादव, विजय काळे, विलास खरोळकर, सौरभ मिरकले, परशुराम दराडे, गणेश क्षीरसागर, कृष्ण पवार यांच्या सह आदी शिवसैनिक उपस्थित होते