Home » माझा बीड जिल्हा » *माजलगावमध्ये तेवीस लाखांचा गुटखा जाळला !*

*माजलगावमध्ये तेवीस लाखांचा गुटखा जाळला !*

*माजलगावमध्ये तेवीस लाखांचा गुटखा जाळला !*
डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के,अन्नसुरक्षा अधिकारी सौ.एस.टी.जाधवर यांची उपस्थिती
——————————
माजलगाव : रविकांत उघडे
तीन वर्षापूर्वी परभणी रोडवरुन घेऊन जात असलेला गोवा गुटखा 23 लाख 25 हजार रुपये किमतीचा पकडलेल्या कारवाई नुसार अन्नभेसळ अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के व अन्न सुरक्षा अधिकारी एस.टी.जाधवर यांच्या उपस्थितीत हा गुटखा दि.4 बुधवार रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात जाळून नष्ट करण्यात आला.
     दि.17 ऑक्टोंबर 2015 रोजी परभणी रोडवर टाटा टेम्पो क्र.एम.एच.18 ए.एन.3752 मध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीनुसार माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक माळी व पोलीस हेड कॉन्स्टेबल दहिफळे यांनी पकडल्या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी औषधी प्रश्नासन बीड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिक महादेव घाडगे रा.डोंडेवाडी ता.खटाव व विष्णू नवनाथ मांडके या दोन आरोपी विरोधात अन्न भेसळ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुटखा नष्ट करण्यासाठी माजलगाव न्यायालयाला पोलिसांनी परवानगी मागितली होती मागितलेल्या परवानगी नुसार माजलगाव न्यायालयाने 3/11/2015 ला दिलेल्या आदेशानुसार आदेशाची प्रत अन्न सुरक्षा भेसळ अधिकारी यांना पोलिसांनी दिली होती.परंतु गुटखा नष्ट करण्याबाबत संबधित विभागाकडुन उदासीनता दाखवली जात होती.सदर प्रक्रिया माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी अन्न भेसळ सुरक्षा अधिकारी सौ एस.टी.जाधवर यांच्याशी संपर्क करून सदरील गुटखा नष्ट करण्याची प्रक्रिया दि.4 बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजनेच्या दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात पंचा सह उपविभागिय पोलीस अधिकारी नवटक्के,पो.नि.मोरे,अन्न सुरक्षा अधिकारी एस.टी.जाधवर यांच्या उपस्थितीत 23 लाख 25 हजार रुपयांचा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.