*ऊष्णतेच्या धगेला वॉलच्या पाण्याचा आधार !!*
—————————— —
गेवराई / आयुब बागवान
आकाशाच छत धरून जमिनीला घर मानून जगणाऱ्या कुटूंबाचे काय हाल असतात हे समजण्या पलिकडे आहे,सूर्य आग ओकत असताना सर्वजन पंखे,कूलर,ऐ सी मध्ये बसून गार वाऱ्याचे आनंद घेत असतांना मात्र दूसरी कड़े उन्हामुळे जिवाची काहिली होत असल्याने रस्त्यावर राहणारे हे कुटुंब रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाइप लाइन वरील वॉल मधून उडत असलेल्या पाण्यावर अंग ठंड करून उन्हा पासून बचाव करताना दिसत आहेत.
बीड औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर शहरातून जय भवानी साखर कारखान्यावर जाणारी पाइप लाइन आहे,सध्या कारखाना सुरु आहे त्या मुळे पाइप लाइन मधून पाणी वाहतो आहे.याच लाइन वर अनेक ठिकाणी वॉल बसवलेले आहे.या वॉल मधून पाण्याचे फवारे उडतात याच फवाऱ्यावर काही गरीब कुटुंब आपली ताहन व स्नान भागवतांना दिसतात.
मार्च महिन्याच्या सरत्या आठवडयापासून उन्हाची तिव्रता वाढली,चटके सहन करण्या पलिकडे झाले,जिवाची काहिली होवू लागली त्या मुळे दुपारी 12 च्या नंतर रस्ते ओस पढू लागले.व्यापारपेठा ही ग्राहका अभावी शांत आहेत.लोक घरी आराम करण्यातच धन्यता मानु लागले,ज्यांच्या कड़े अंगाला ठण्डवा देणारे यंत्र तंत्र आहे ते गारवा अंगाला झोबुस्तर घेवु लागले पण ज्यांना घर नाहीत रोज एक वेळ खाण्याची भ्रंता आहे असे आनेक कुटुंब सध्या सावलीच्या शोधार्थ भटकंती करत असतांना दिसतात. अशाच एका गरीब परिवारातील काही सदस्यांनी,बाल गोपाळांनी उन्हापासून बचाव करत ऊघड्यावर पाइप लाइनवर बसवलेल्या वॉल मधून उडत असलेल्या ठंड पाण्याच्या फवाऱ्या खाली बसून आंघोळी केल्या तसेच आपली व आपल्या कुटुंबातील लोकांची ताहन ही भागवली.उड़णाऱ्या पाण्यावर मन मुरादपणे अंघोळ करण्याचा या लोकांचा जो आनंद आहे तो घरातल्या सावर किंवा नळामध्ये नक्कीच नाही मिळणार असल्याचे मत अनेक लोकांनी हे द्रष्य पाहून व्यक्त केले.
अय्युब बागवान
पत्रकार ,गेवराई 9822778990