Home » माझा बीड जिल्हा » *भिडेच्या अटकेसाठी भारिपचा जिल्हाभर घंटानाद*

*भिडेच्या अटकेसाठी भारिपचा जिल्हाभर घंटानाद*

*भिडेच्या अटकेसाठी भारिपचा जिल्हाभर घंटानाद*
बीड,दि.3(प्रतिनिधी)ःभिमा कोरेगाव येथे हिंसाचार घडवून आणणारा मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याला तात्काळ अटक करावी. या मागणीसह अन्य मागण्या हाती घेत संविधानिक मार्गाने भारिप बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर मंगळवार (दि.3) एप्रिल रोजी घंटानाद आंदोलन करीत गेड्यांची कातडी पांघरलेल्या सरकारचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला.
भारिप बहूजन महासंघाच्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्तेत जावून बसलेलेल्या विषमतावादी पक्षांनी बहूजन समाजाचे पुरते वाटोळे करून टाकले आहे. या सरकारने बहूजनांच्या हिताचा एकही चांगला निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बहूजन समाज देशोधडीला लागला आहे. भिमा कोरेगाव घटनेतील संभाजी भिडे हा पहिल्या क्रमांकाचा आरोपी असतानाही त्याला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. कायदा हा सर्वांना समाना आहे, मंग सरकार भिडेला अटक करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला का देत नाही. दंगल घडवून आणणार्‍या भिडेची सरकार का पाठराखण करीत आहे. आदरणीय अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आपणास आठ दिवसांची डेडलाईन दिलेली आहे. असे असतानाही जर का भिडेला अटक झाली नाही तर भारिप पुन्हा आंदोलनाचा बडगा उचलल्याशिवाय राहणार नाही. निवेदनात असेही म्हटले आहे की, एवढेच काय तर शिक्षणामुळे उध्दार होतो आहे म्हणून चक्क विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीवर घाला घालण्याचे काम संघप्रणित भाजप सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे अशा अहित धोरणे राबविणार्‍या सरकारच्या विरोधात जिल्ह्यातिल अकराही तालुक्याच्या तहसिलसमोर भारिपचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलने करण्यात आली. यात बीडमध्ये राहूल वडमारे, संतोष जोगदंड, धम्मानंद वाघमारे, गेवराई रविंद्र पाटोळ,परळी परमेश्‍वर लांडगे, वडवणी चरणराज वाघमारे, धारूर इंजि.प्रशांत उघडे, सचिन गायसमुद्रे, माजलगाव धम्मानंद साळवे, अंबाजोगाई मारोती सरवदे, आष्टी अनिल साळवे, पाटोदा सचिन मेघडंबर, केज बाबासाहेब मस्के, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा महासचिव प्रकाश उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदारांना निवेदने देण्यात आली.या घंटानाद आंदोलनामध्ये अजय सरवदे, अजय साबळे, संघर्ष पंडित, मिलिंद हराळे, ज्ञानेश्‍वर कवठेकर, माणिक वाघमारे, गोविंद पाटेकर, अ‍ॅड.अशोक शेठे, शिवा थोरात, दिपक बनसोडे, सदानंद वाघमारे, विशाल सुर्यवंशी, वाघमारे, पुप्षाताई तुरूकमाने, प्रा.छाया घडगे, अम्रपाली गायकवाड,  यांच्यासह भारिप पदाधिकारी, महिला आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने  घंटानाद  आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
चौकट
शासन दरबारी मांडल्या मागण्या
बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घ्या
ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी शिष्यवृत्ती द्या
एससी-एसटी विद्यार्थ्याची थकित शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी
टीस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात
शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करा

Leave a Reply

Your email address will not be published.