Home » माझा बीड जिल्हा » पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा द्या.

पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा द्या.

पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा द्या.

परिसरातील शेकडो ग्रामस्थांचे उपोषण, घोषणांनी परिसरार दणानला

बीड (प्रतिनिधी) : गत पंचेचाळीस वर्षापासून पिंपळनेर ग्रामस्थांची तालुक्याचा दर्जा द्या म्हणून मागणी करण्यात आली होती, परंतु शासनाने अद्यापही लक्ष दिले नसल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहे असून दि. २ एप्रील रोजी पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा द्या या मागणीसाठी गाव कडकडीत बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करुन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी प्रथम ४५ वर्षापुर्वी करण्यात आली होती. अनेक वेळा यासाठी आंदोलनने करण्यात आली. परंतु शासनाने अद्यापही पिंपळनेरच्या तालुका निर्मितीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. अंबाजोगाई जिल्हानिर्मितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बीड तालुक्याचे विभाजन करुन लोकांच्या हितासाठी आणि वेळेत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी आज दि.२ एप्रील रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंपळनेर परिसरातील शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करुन परिसर दणाणून गेला होता. यावेळी नागरिक आक्रमक दिसून येत होते. पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा न दिल्यास यानंतरही मोठे आक्रमक लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, आजी,माजी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेट देवून दिला पाठींबा
पिंपळनेर तालुका निर्मितीच्या मागणीचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असताना आ. जयदत्त क्षीरसारग, आ. अमरसिंह पंडित, आ. लक्ष्मण पवार, माजी मंत्री बदामराव पंडित, संदिप क्षीरसागर, कुंडलिक खांडे, परमेश्वर सातपुते, भागीरथ बियाणी, गणपत डोईफोडे, मदनराव चव्हाण, सतिष पाटील, ॲड. शफीक शेख, राजेंद्र आमटे, शुभम धुत, अजिंक्य चांदणे, गंगाधर घुमरे, कॉ. नामदेव चव्हाण, हॅरीसन फ्रान्सीस रेड्डी, सुनिल पाटील,किशोर सुरवसे, मनोज पाटील, रामेश्वर मुंडे, भारत जवळकर, राजाभाऊ गवळी आदींनी भेटी देवून पाठींबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.