जयभिम महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल!
जयभिम महोत्सवाचा आनंद घ्यावा संयोजन समितीचे आवाहन
बीड,दि.3(प्रतिनिधी)ः- विश्वरत्न, बोधीसत्व, महामानव तथा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडच्या वतीने विविध कार्यक्रमाने साजरी होत आहे. हा जयभिम महोत्सव गुरूवार (दि.5) एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा होत असून या महोत्सवात धम्मदेसना, व्याख्याने, आरोग्य, विद्रोही कवि संमेलन, रक्तदान शिबिरे, भिमगीत स्पर्धा, समता ज्योत मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. तरी या जयभिम महोत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे.
दरवर्षी विविध परिवर्तनवादी व सांस्कृतिक कार्यक्रमाने जयभिम महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडच्या वतीने विविध परिवर्तनवादी कार्यक्रम हाती घेत साजरी होत आहे. या जयभिम महोत्सवाची गुरूवार (दि.5) एप्रिल पासून रक्तदान शिबीर व धम्मदेसना कार्यक्रम घेवून सुरूवात झाली आहे. हा जयभिम महोत्सव 14 एप्रिल पर्यंत चालणार असून या दहा दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. विशेषतः म्हणजे बीडच्या सार्वजनिक जयभिम महोत्सवाचे कौतूक अवघ्या महाराष्ट्राने केलेले असून हा जयभिम महोत्सव आदर्श व प्रेरणा घालून देणारा ठरलेला आहे. एवढेच नाही तर गेल्या काही वर्षांपासून बीडची आंबेडकरी जनता स्वबळावर हा जयभिम महोत्सव साजरा करीत आहे. त्यामुळे अवघ्या राज्याने बीड जयभिम महोत्सवाची प्रेरणा घेतलेली असून आता अनेक जिल्हे-गावे अशा आदर्श घालून देणार्या जयंत्या काढू लागले आहेत. हा जयभिम महोत्सव परिवर्तनाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीसह आंबेडकरी समुदायातील उपासक-उपासीका तसेच प्रत्येक व्यक्क्ती आपआपली जबाबदारी पार पाडत आहे. तरी या जयभिम महोत्सवाच्या सर्व कार्यक्रमांचा शहरासह जिल्ह्यातील तमाम जनतेनी आनंद घ्यावा असे आवाहन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख संतोष जाधव यांच्यासह बी.डी.साळवे, प्रा.प्रदिप रोडे, डॉ.सतिष साळुंखे, अजिंक्य चांदणे, भास्कर सरपते, एस.टी.गायकवाड, प्रेमचंद सिरसट, मनोज वाघमारे, अॅड.सुरेश वडमारे, राम गव्हाणे, रावसाहेब गंगाधरे, पंडित मुने, अॅड.श्रिकांत साबळे, अमर विद्यागर, यांच्यासह केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या आदी पदाधिकारी, कार्यकर्ता यांनी केले आहे.
चौकट
असे होणार कार्यक्रम
गुरूवार दि.5 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 10 ते 5 पर्यंत रक्तदान शिबीर सायं 6.30 वाजता धम्मदेसना.शुक्रवार दि.6 व 7 रोजी रोजी आंबेडकर भवन येथे 6.30 वाजता व्यायान. रविवार दि.8 रोजी तुलसी इंग्लिस स्कुल येथे 9 ते 12 या वेळेत महापुरूष सामान्यज्ञान स्पर्धा. सकाळी 11 ते 5 यावेळत आंबेडकर भवन येथे भिमगीत गायण स्पर्धा. तर सायं 6.30 वाजता व्याख्यान. सोमवार दि.9 रोजी आंबेडकर भवन येथे ऑर्केस्ट्रा भिम संध्या ही निळ्या पाखरांची. मंगळवार दि.10 रोजी आंबेडकर भवन येथे सायं 6.30 वाजता व्याख्यान. बुधवार दि.11 रोजी महात्मा फुले जयंतिनिमित्त सकाळी 8 वाजता अभिवादन कार्यक्रम. सायं 6.30 वाजता आंबेडकर भवन येथे व्याख्यान.गुरूवार दि.12 रोजी आंबेडकर भवन येथे विद्रोहि कवि संमेलन तर सायं 6.30 वाजता व्याख्यान. शुक्रवार दि.13 रोजी सेवादल मैदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायं 6.30 वाजता भिमगीत संगीत रजनी कार्यक्रम. तर रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आंबेडकर पुतळा समता ज्योत रॅली. शनिवार दि.14 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता छ.शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत प्रभात फेरी व अभिवादन कार्यक्रम तर सायंकाळी 5 वा. छ.शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे.