बीड प्रतिनिधि
मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी विलास डोळसे यांची निवड करण्यात आली.
दै.पुण्यनगरीचे बीड जिल्हा प्रतिनिधी व मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा सरचिटणीस भास्कर चोपडे यांचे नुकतेच निधन झाले होते.परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर परिषदेचे विश्वासु सभासद विलास डोळसे यांची बीड येथिल शाशकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.मयत भास्करराव चोपडे यांच्यावर श्रध्दांजली अर्पन करत बाठकीस सुरुवात झाली.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन,जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे,जिल्हा उपाध्यक्ष सतीश बियानी सय्यद शाकेर ,प्रदेश प्रतीनीधी विशाल सांळूके,अधिस्विकृती सदस्य अनिल वाघमारे,सोशल मिडिया सेल प्रतिनिधी संतोष स्वामी रामचंद्र जोशी ,संपादक नागनाथ सोनटक्के,अनिल आष्टपूञे हरीश यादव प्रकाश काळे जुनैद बागवान,हनूमान बडे बालाप्रसाद जाजू सुर्यकांत बडे लक्ष्मन नरनाळे जगन्नाथ परजाने प्रंचड सोंळके प्रदीप मुळे उपस्थित होते.