Home » महाराष्ट्र माझा » *संगणकाच्या युगात कुस्ती स्पर्धेला चांगले दिवस – कराड*

*संगणकाच्या युगात कुस्ती स्पर्धेला चांगले दिवस – कराड*

*संगणकाच्या युगात कुस्ती स्पर्धेला चांगले दिवस – कराड*
– केसरी किताब (गदा) पैलवान हरि गोरे यांनी पटकावला
– प्रथमच झाल्या महिला कुस्ती स्पर्धा
– मोटार सायकल रॅलीने परळी दुमदुमली;
परळी / डोंगरचा राजा
     मोबाइल व संगणकाच्या युगातून थोडासा वेळ काढून मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे याच विचारांनी श्री.संत भगवानबाबा व्यामशाळेचे संस्थापक, व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तालुकाअध्यक्ष, कुस्तीप्रेमी पैलवान मुरलीधर भागवत मुंडे यांच्या पुढाकाराने तळेगाव येथे कुस्ती स्पर्धेचे गेल्या चार वर्षापासुन आयोजन करण्यात येते हे अनुकरणी असुन गरजेचे आहे असे गौरव उद्गार भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी काढले.
    तालुक्यातील तळेगाव येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जयंती निमित्ताने जयहिंद युवक व्यायाम शाळा व क्रीडा मंडळा तसेच श्री संत भगवानबाबा व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 31 मार्च रोजी महिला व पुरुष भव्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आली.
    या स्पर्धेचे उद्घाटन फुलचंद कराड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी इंटकचे राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय गुट्टे हे होते. यावेळी बोलतांना पैलवान शिवाजी केकान यांनी कुस्तीचे महत्व पटवुन दिले. ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धेला आजही प्राधान्य दिले जाते. परळी तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित करण्यात आलेली कुस्ती स्पर्धा उल्लेखनिय ठरणारी ठरली. यावेळी बोलतांना इंटकचे नेते दत्तात्रय गुट्टे यांनी यापुढेही आपण कुस्ती स्पर्धेला सहकार्य करण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले.
    या कुस्ती स्पर्धेचे प्रास्ताविक मुरलीधर मुंडे यांनी केले. तळेगाव येथे हनुमान जयंती निमित्त गेल्या चार वर्षापासुन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते पुढील वर्षापासुन या स्पर्धेचे स्वरुप व्यापक करण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
        शहरातील श्री.संत भगवानबाबा मंदिर येथे शनिवारी दुपारी मोटार सायकल रॅली महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजी केकान व दत्तात्रय गुट्टे  यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी ते तळेगाव निघाली. मोटार सायकल रॅली ईटके कॉर्नर, राणी लक्ष्मीबाई टॉवर, कृष्णा टॉकीज, शिवाजी चौक, बसस्थानक, उड्डानपुल मार्गे टोकवाडीहुन तळेगाव येथे पोहोंचली. दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी चौकातील पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
    कुस्ती स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात घेण्यात आल्या. भगवान बाबा केशरी किताब विजेता हारी गोरे (चाटगाव) हे ठरले. त्यांना फुलचंद कराड यांच्या हस्ते रोख पाच हजार रुपये चांदीचा (गदा) देण्यात आला. तर उपविजेता कल्याण गित्ते (चांदापुर) हे ठरले. त्यांना पैलवान शिवाजी केकान यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देण्यात आले. पैलवान दादाराव गुट्टे यांच्या वतीने या कुस्तीचे मानधन देण्यात आले. तर महिला गटातील पैलवान कु.प्रतिक्षा सुर्यकांत मुंडे यांनी गंगाखेडच्या स्पर्धेकावर मात केली. त्यांना कै.कलावती  माणिक मुंडे महिला किताब व रोख रक्कम देण्यात आली. या कुस्तीचे मानधन पैलवान केदार तात्याराव मुंडे यांनी दिले. तर द्वित्तीय विजेत्या गंगाखेडच्या कु.स्वपनाली कदम या ठरल्या. परळी तालुक्यात महिलांच्या कुस्ती स्पर्धा प्रथमच घेण्यात आला. यावेळी पंच म्हणून ज्येष्ठ क्रिडा शिक्षम सुभाष नानेकर, प्रकाश मुंडे, राजु मुंडे, गणेश मुंडे, बंडु मुंडे यांनी काम पाहिले.
    कुस्ती स्पर्धेस प्रमुख म्हणून श्रीराम मुंडे, माणिक फड, आयुब खाँ पठाण, गोपाळराव आंधळे, प्रमादे कराड, सुर्यभान मुंडे, पैलवान दादाराव गुट्टे, दादाहारी वडगाव, नारायणदेव खाडे, महादेव काळे, शिवशंकर कराड, प्रा.अतुल दुबे, प्रा.जगदीश कावळे, सुर्यकांत मुंडे, कन्हेरवाडी, पैलवान दगडुबा मुंडे, त्रिंबक तांबडे, जनार्धन मुंडे, पैलवान भागवत मुंडे, दगडु मुंडे, बालासाहेब फड, आघाव, केदार तात्याराव मुंडे, ज्ञानोबा मुंडे, गोविंद  कांबळे मोहेकर हे उपस्थित होते. रॅलीत वसंत फड, पत्रकार महादेव गित्ते, मोहन मुंडे, माऊली मुंडे, मंजु कराड, प्रशांत कराड, मुक्ताराम कराड यांचा पुढाकार होता. कुस्ती पाहण्यासाठी मराठवाड्यातुन मल्ल आले होते अशी माहिती आयोजक तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर भागवत मुंडे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published.