Home » माझी वडवणी » पुसरा येथे अखंड हारिनाम सप्ताहास प्रारंभ

पुसरा येथे अखंड हारिनाम सप्ताहास प्रारंभ

पुसरा येथे अखंड हारिनाम सप्ताहास प्रारंभ
*  सात दिवस रंगणार सोहळा
वडवणी/डोंगरचा राजा
पुसरा येथे हानुमान जन्मउत्सवानिमत्त  पार पडत आसलेला आखंड हारिनाम सप्ताह आज पासुन मोठ्या उत्सावात प्रारंभ झाला. या सप्ताहास विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा आसे आवाहान समस्त पुसरा गावकरी मंडळीने केले आहे.
          दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही तालुक्यातील नवाजलेल्या पुसरा येथील आखिल कोटी ब्रम्हांड नायक रूकमिणी प्राण संजिवनी भगवान पंढरीच्या पांडुरंग प्रमाथम्याच्या कृपा आशिर्वादाने, जगतगरू संत तुकाराम महाराज, छञपती शिवाजी महाराज सह सकल संतमहतंच्या आशिर्वादाने कलयुगातील द्वेशाने कलुशीत झालेल्या मानवाचे मन संताच्या विचाराचे आचारण व्हावे याकरिता  सर्व भजनी मंडळी व गावकर्याच्या सहकार्याने आतिशय भक्तीमय वातवरणात चालु आसलेला आखंड हरिनाम सप्ताह विवीध कार्यकर्माची रेलचेल मोठ्या प्रमणात अन्नदान करण्यात येते कार्यक्रमाची रूपरेषा आशी यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 विष्णु सहस्ञनाम पाठ 11 ते 12 गाथाभजन, 2 ते 5 भागवत कथा, 5 ते 6 हरिपाठ, 9 ते 11 हरिकिर्तन व राञी हारिजागर आसे रोज कार्यक्रम राबविले जात होते. तसेच दि.1.एप्रिल रोजी ह.भ.प.श्री. रामेश्वर महाराज मतेयुवा किर्तनकार, दि.2 एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. भागवताचार्य कल्याण महाराज देवडकर, दि.3 एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. भागवताचार्य गणेश महाराज कोळसकर, दि.4 एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. रामायणाचार्य महेश महाराज हारवणे, दि.5 एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. विनोदाचार्य रामेश्वर आण्णा राऊत, दि.6 एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. भागवताचार्य श्रीराम महाराज शेळके, दि.7 रोजी श्री. ह.भ.प. भगवान महाराज पुरी तर रविवार दि. 08 एप्रिल रोजी श्री. ह.भ.प. एकनाथ महाराज माने यांचे सकाळी 11 ते 1 आमृततुल्य काल्याचे किर्तनाने सांगता होईल. नंतर श्री. रामकिसन ग्यानबा पवार यांच्या तर्फे महाप्रसाद होईल. तरी काल्याच्या किर्तनासह महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तासह नागरिकांनी याचा लाभ घेवा आसे आवाहान पुसरा येथील समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.