*शिवसेनेच्या शिबीरात ७४१४ रुग्णांना लाभ*
परळी शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई व ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त जागर शिवशाहीचा अभियान अंतर्गत परळी तालुक्यात विविध गावामध्ये २१ दिवस आरोग्य शिबीर रावबविण्यात आले. या शिबीरात आरोग्य चिकित्सा, नेत्रपरिक्षण, औषध वाटप व चष्मा वाटप करण्यात आले. शिबीरात ७४१४ रूग्णांची तपासणी करण्यात आली.
या भव्य शिबीराचा शुभारंभ दि.१० मार्च २०१८ रोजी परळी येथील ज्ञानबोधिनी शाळा कृष्णा नगर येथून करण्यात आला होता.त्यानंतर माणिक नगर, मोंढा मार्केट, गणेशपार, होळकर चौक, शिवाजी नगर, पेठ गल्ली, सुभाष चौक, सिरसाळा, पोहनेर, कौडगाव हुडा, गाढे पिंपळगाव, पांगरी कॅम्प, नागापूर, दादाहरी वडगाव, जिरेवाडी, बेलंबा, मांडवा, मोहा, टोकवाडी, पिंप्री बु.,धर्मापूरी या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, महिला आघाडीच्या मराठवाडा संपर्क प्रमुख गडकरी ताई, शिवसेना परळी विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश तेलगोटे, जिल्हा संघटक रत्नमाला मुंडे यांनी या शिबीरास भेट दिली व शिवसेनेच्या या कार्याचे कौतूक केले.
या शिबीराचा समारोप दि. ३० मार्च रोजी परळीतील सुभाष चौक येथील सरस्वती विद्यालय येथे झाला.या कार्यक्रमाला शिवसेना परळी विधानसभा संपर्क प्रमुख तेलगोटे हे उपस्थित होते. समारोपाचे शिबीर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत घेण्यात आले. २२ दिवस चाललेल्या या शिबीरात मुंबई व ठाणे येथील तज्ञ डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी करून मोफत औषध देवून उपाचार केला तसेच नेत्र परिक्षण करून चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबीरात ७४१४ रूग्णांनी लाभ घेतला व यात सहभागी झालेल्या रूग्णांनी परळी शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतूक करून आभार मानले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके, शहरप्रमुख राजेश विभूते, युवासेना तालुका अधिकारी व्यंकटेश शिंदे, अभयकुमार ठक्कर, राजाभौय्या पांडे, भोजराज पालीवाल यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी परिश्रम घेतले