Home » माझा बीड जिल्हा » *माजलगांव तालुक्यांत वाळुच्या टेंडरचा लिलाव जाहिर*

*माजलगांव तालुक्यांत वाळुच्या टेंडरचा लिलाव जाहिर*

*माजलगांव तालुक्यांत वाळुच्या टेंडरचा लिलाव जाहिर*
माजलगांव /रविकांत उघडे
सांडसचिंचोली,डुब्बाथडी, आडोळा व छत्रबोरगांव या ठिकाणाहुन होणार वाळु उपसा. माजलगांव तालुक्यांतील  सांडसचिंचोली,डुब्बाथडी, आडोळा व छत्रबोरगांव या ठिकाणाहुन होणार  आता वाळु उपसा.या वाळु घाटातुन एकुण  १४५०५ ब्रासचा साठा आहे. तो ३०सप्टेंबर अखेर पर्यंत किंवा कमितकमी कालावधी जो असेल त्यामध्ये हा वाळुउपसा करावयाचा आहे.तो सबंधित ठेकेदारांकडून नियमात करावयाचा आहे.तसे जाहिरप्रगटन संबधित उपविभागाचे कार्यालयातिल भिंतिवर डकवायचे  आदेश मा.जिल्हाधिकारी बिड यांनी दिले आहेत.
     याबाबत सर्व तहसिल कार्यालयाला तसे आदेश दिले आहेत.तरी इच्छुक ठेकेदारांकडून तिन टप्प्यांत हे इ-टेंडर द्वारे मागणी करण्यात आली आहे.तालुक्यांतील  चार वाळु घाटाचे लिलाव सन २०१७ -१८ करिता वाळु लिलावाचे ई- टेंडर /निविदेच्या प्रसिद्धीसाठी  अटि व शर्ती प्रमाणे  वाळुसाठा व किंमत पुढीलप्रमाणे  निश्चित  करण्यात आली आहे.१)सांडसचिंचोली १४३१ ब्रास, किंमत रु.४४००३२५/- २)डुब्बाथडी ५०८८ ब्रास, किंमत रु.५८७६६४०/- ३)छत्रबोरगांव ६७१४ ब्रास ,किंमत रु.७२६४५४८/- ४)अाडोळा   १२७२ ब्रास, किंमत रु.१५५८२००/- या किंमतिच्या २५% अनामत रक्कम भरुन आॅनलाइन अर्ज करु शकता.
अ)३००० हजार ब्रास  तिन महिने ते ३०सप्टेंबर २०१८ पर्यंत किंवा जो कमी कालावधी असेल तोपर्यंतच वाळु उपसा करता येईल.
ब)३००० ते ४५०० ब्रास  चार महिने किंवा किमान  ३०सप्टेंबर २०१८ पर्यंत किंवा जो कमी कालावधी असेल तोपर्यंतच वाळु उपसा करता येईल. महिनेचे आत.
क) ४५०१ ते ६००० ब्रास सहा महिने ३०सप्टेंबर २०१८ पर्यंत किंवा जो कमी कालावधी असेल तोपर्यंतच वाळु उपसा करता येईल.
ड) ६००० ते पुढे
     ३०सप्टेंबर २०१८ पर्यंतच या कालावधी तोपर्यंतच वाळु उपसा करता येईल. ३ एप्रिल ते ९ मे या कालावधीमध्ये तिन टप्प्यांत होणार आहे .याचि सर्व नागरिकांनि नोंद घ्यावि, असे जिल्हाधिकारी बिड यांनी अवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.