Home » माझा बीड जिल्हा »  *जैन संघटनेच्या रक्तदान शिबिरात ३५ जणांचे रक्तदान*

 *जैन संघटनेच्या रक्तदान शिबिरात ३५ जणांचे रक्तदान*

 *जैन संघटनेच्या रक्तदान शिबिरात ३५ जणांचे रक्तदान*
भगवान महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
अंबाजोगाई -डोंगरचा राजा ऑनलाईन
  येथील भारतीय जैन संघटना, जैन युवक मंडळ व सन्मति सेवादल यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी जैनस्थानक येथे झालेल्या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
येथील भारतीय जैन संघटना, जैन युवक मंडळ, सन्मति सेवादल, १००८  विमलनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते गौतमचंद सोळंकी, प्रकास मुथा,सुभाष बडेरा, शांतिलाल सेठिया, विजय मुथा, प्रकाश सोळंकी, प्रकाश मर्लेचा, राजेंद्र कात्रेला, अनिल कात्रेला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपिठावर भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष धनराज सोळंकी, सचिव निलेश मुथा, जैन युवक संघटनेचे अध्यक्ष विजय बडेरा, सचिव मुदित मर्लेचा व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गौतमचंद सोळंकी म्हणाले की, समाजाशी रक्ताने नाते जोडण्याची किमया रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साध्य होते. जैन समाजातील युवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात महावितरणचे कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी, सौरभ कर्नावट, अमित मुथा, आनंद कर्नावट, सचिन कात्रेला, तानाजी निंबाळकर, सुशिल डागा, सुनिल मुथा, संजय सुराणा, मयुरी मुथा, सुमित मुथा, समीर लाटा, श्रेणिक कात्रेला, शेख मुजीब, शेख नवाज, ओंकार देशपांडे, सुमित स्वामी, विनोद पोखरकर, परमेश्वर गंगणे,  पांडुरंग सोळंके, अक्षय कंगळे, वैशाली ढोकर, अभिनव सोळंकी, सुहास मोहिते, संजय सुर्यवंशी, ईश्वर सुुर्वे, संतोष डागा, दीपक चव्हाण, विशाल खिलोसिया, अमोल कोंडेकर, प्रतिक बोथरा, सोनाली कर्नावट, निलेश मुथा, प्रविण सोळंकी, धनराज सोळंकी, विजय बडेरा, सुमिज मुथा, जवाहर मर्लेचा, ऋषभ मुथा, पियुष मुथा, विनोद मुथा, प्रविण कात्रेला, इंद्र लोढा, मनोज लोढा, सचिन कर्नावट यांनी रक्तदान केले.
*भव्य शोभायात्रा*
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अंबाजोगाई शहरातील जैन बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा अंबाजोगाई शहरातून निघाली होती. जैन मंदिरातून निघालेली ही शोभायात्रा कुत्तरविहिर, मंडीबाजार, गुरुवारपेठ, शिवाजी चौक, सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे परत मंदिरस्थळी पोहचली. यावेळी विविध उपक्रम झाले. यावेळी जैन संघटनेचे बाळासाहेब मांडवकर, शैलेश कंगळे, अनिल जैन, अभिजित जोंधळे, रमाकांत जयगावकर यांच्यासह  भारतीय जैन संघटना, जैन युवक मंडळ यांचे पदाधिकारी व समाजबांधव व महिला  मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.
 ———– फोटो ईमेलवर आहे ृ—-

Leave a Reply

Your email address will not be published.