Home » Uncategorized » सरकारकडे बेरोजगांराच्या हितासाठी कसलेच धोरण  नाही- डॉ.संतोष मुंडे

सरकारकडे बेरोजगांराच्या हितासाठी कसलेच धोरण  नाही- डॉ.संतोष मुंडे

सरकारकडे बेरोजगांराच्या हितासाठी कसलेच धोरण  नाही- डॉ.संतोष मुंडे
परभणी/ डोंगरचा राजा ऑनलाईन
    देशात सरकारकडे बेरोजगांरांच्या हाताला काम मिळावे असे कुठलेही ठोस धोरण नसल्याने राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बरोजगार युवकांमध्ये असंतोष खदखदत आहे.  या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते  पाटील यांनी परभणीत केला दिला आहे.
   जिल्हा परिषद कॉर्टर ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या दरम्यान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोते पाटील व प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा अक्रोश मोर्च्या काढण्यात आला. या मोर्च्यांकरा समोर बोलतांना संंग्राम कोते पाटील व प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी सरकारवर कडाडुन टिका केली.
जिल्हा परिषद कॉर्टर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या युवा आक्रोश मोर्चात जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव,
 शहरचे जिल्हाध्यक्ष किरण तळेकर, प्रा.किरण सोनटक्के, शशिकांत वडकुते, हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे,  मारोती बनसोडे, पंकज आंबेगावकर, तानाजी कदम,खालीद शेख, सुदर्शन काळे, शेख इम्तियाज, बाळा देशमुख, गोविंद. गोळेगावकर, गजानन घाडगे, गजानन वैद्य यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या मोर्चात
जिल्ह्यातील युवकचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच  पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    डॉ.संतोष मुंडे यांनी सरकारवर हल्ला चढवितांना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने हल्ला बोल यात्रा काढली, यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्यात आज नौकर भरती होत नसल्याने हजारो युवकांच्या नौकर्‍यांचा प्रश्‍नही प्रलंबीत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना या फसव्या असल्याने अशा योजनेत काम करणारे युवक तसेच हजारो कर्मचारी बेरोजगार झाले.
सरकारने बेरोजगारांसाठी कुठलेच धोरण अवलंबिले नसल्याने बेरोजगार कमी होण्याऐवजी या सरकारच्या काळात वाढला आहे. बेरोजगार तरुणांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला जाब विचारण्याची वेळ येवून ठेपली आहे. असे डॉ.संतोष मुंडे यांनी आपल्या भाषणातुन सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस युवकांच्या व बेरोजगारांच्या भल्यासाठी धोरण आखत आहे. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मागणीची निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.