*मंजरथ येथे दहावे शिवार साहित्य संमेलन*
*स्वागताध्यक्षपदी सरपंच ऋतुजा आनंदगावकर*
माजलगाव /रविकांत उघडे
येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने घेण्यात येणारे दहावे शिवार साहित्य संमेलन मंजरथ येथे होणार असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंजरथच्या सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर यांची निवड करण्यात आली.
[] गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले मंजरथ हे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या गावाला एैतिहासिक तसेच पौराणिक महत्व आहे. मंजरथ गावच्या सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या एअरोनाॅटिकल इंजिनिअर असून त्या या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत. यापुर्वी मंजरथ धाकटे, नाखलगाव, फुले पिंपळगाव, दिंद्रुड, सादोळा, पात्रुड, नित्रुड, रोषणपुरी, भाटवडगाव येथे शिवार साहित्य संमेलन घेण्यात आले. या संमेलनाची तारीख व संमेलनाध्यक्षाची निवड लवकरच करण्यात येणार असल्याची माहीती मसापचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.कमलाकर कांबळे ,उपाध्यक्ष मुकुंदराज सोळंके, डाॅ. भाऊसाहेब राठोड, बालासाहेब झोडगे यांनी दिली