Home » Uncategorized » *भगवानगडावरच्या नारळी सप्ताहास तागडगावात सुरुवात*

*भगवानगडावरच्या नारळी सप्ताहास तागडगावात सुरुवात*

*भगवानगडावरच्या नारळी सप्ताहास तागडगावात सुरुवात*
डोंगरचा राजा /ऑनलाईन
 श्रीसंत भगवानबाबा मुंडेमुळे स्फूर्ती येते -खा. प्रीतम मुंडे
बाबांच्या शिकवणीमुळेच समाजाला प्रतिष्ठा -ना.धनंजय
श्रीसंत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाची सुरुवात आज गडाचे मठाधिपती महंत ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तागडगावमध्ये पुष्पवृष्टी करत झाली. या वेळी भगवानबाबांच्या विचारांवर जो चालतो तो यशाचे शिखर गाठतो, असं म्हणत भाषणाचा वाद हा केवळ भगवानगडापुरता मर्यादीत होता, असे प्रतिपादन या सप्ताहा दरम्यान महंत नामेदव शास्त्री महाराज यांनी केले. तर बाबा प्रत्येकाच्या मनातल्या मंदिरात असले पाहिजेत. बाबांच्या शिकवणुकीमुळेच समाजाला प्रतिष्ठा मिळाली. ही प्रतिष्ठा पिढ्या न् पिढ्या टिकली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या वेळी दिली तर संत भगवानबाबा यांच्याबाबत ऐकले तरी स्फूर्ति येते. त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केले, असे प्रतिपादन खा. प्रीतम मुंडे यांनी केले. संतश्रेष्ठ श्रीसंत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाचा ८५ वा नारळी सप्ताह तागडगाव येथे आजपासून प्रारंभ झाला आहे. भगवानगडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री महाराज, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजच्या सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. या वेळी हजारो भक्तगण याठिकाणी उपस्थित होते. भाषणाचा वाद हा भगवानगडापुणता मर्यादीत असल्याचे सांगत महंत नामदेव शास्त्री यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांच्यासह उपस्थितांना भगवानबाबांच्या कार्याची आणि भगवानबाबांच्या सिद्धांताची शिदोरी आपल्या भाषणातून वाटली. या वेळी खा. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्तेही पुष्पवृष्टी झाली. धार्मिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आपण बोलत नाहीत, परंतु महंतांनी बोलण्याचं सांगितलं म्हणून आपण याठिकाणी बोलत आहोत, असं म्हणत धनंजय मुंडेंनी बाबा प्रत्येकाच्या मनातल्या मंदिरात असे पाहिजेत, कारण संत भगवानबाबांनी माणसातला माणूस घडवला. बाबांनी चांगली शिकवणुक दिली त्यामुळेच समाजाला प्रतिष्ठा मिळाली. मिळालेली प्रतिष्ठा पिढ्या न् पिढ्या टिकली पाहिजे, त्यासाठी आता काम केले पाहिजे, असे सुतोवाच केले. तर खा. प्रीतम मुंडे म्हणाल्या, मला राजकीय भाषण येत नाही आणि मला ते करायचे नाही. मी राजकीय नेता म्हणून आले नाही तर तुमची लेक म्हणून तुम्ही मला बोलावलं आणि माझी बाबांवर तुमच्या इतकीच असणार्‍या श्रद्धेने मी इथे आले आहे.बाबांनी समाजाला एकात्मतेची शिकवण दिली,स्त्रीला सन्मान मिळुन दिला, तिची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होईल असा संदेश दिला. ५० एकरमध्ये उभारलेल्या मंडपात सप्ताहाचा कार्यक्रम सुरू असून या सप्ताहासाठी हजारो भक्तगण तागडगावात सप्ताहासाठी उपस्थित आहेत. या प्रसंगी मठाधिपती नामदेव शास्त्री, अतुल महाराज राख,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सुरेश नवले ,संदीप क्षिरसागर राधताई सानप, यांची उपस्थिती होती.
मुंडेसाहेबांनी रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यत जोपसलेला भगवानबाबांच्या भक्तीचा वारसा अत्यंत लिनतेने व भक्तीमार्गाने पुढे घेऊन जानार्या विश्वविक्रमी खा.डाॅ.प्रितमताई गोपिनाथराव मुंडे.
ना कुठला अभिनिवेश ना कुठला गर्व, भक्तीरसाचा कलष डोक्यावर घेऊन चालताना भगवानबाबांच्या सप्ताह सुरूवात प्रसंगी आज तागडगावात जिल्हयाच्या लाडक्या खा.ताईसाहेब

Leave a Reply

Your email address will not be published.