Home » Uncategorized » *ना.पंकजाताई मुंडे मुळेच परळीत उभी राहतेय पं.स.ची इमारत*

*ना.पंकजाताई मुंडे मुळेच परळीत उभी राहतेय पं.स.ची इमारत*

*ना.पंकजाताई मुंडे मुळेच परळीत उभी राहतेय पं.स.ची इमारत*

-इमारतीचे काम पूर्णत्वाकडे, जि.प.ची सर्व कार्यालये एकाच छताखाली.

*परळी/डोंगरचा राजा आँनलाईन*
— राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाची चुणूक सातत्याने मतदारसंघात दिसून येत आहे, एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतांना दुसरीकडे केवळ त्यांच्यामुळे शहराच्या वैभवात भर घालणारी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली पंचायत समितीची देखणी इमारत सध्या उभी रहात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची कार्यालये एकाच छताखाली असणा-या या इमारतीचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
    ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी परळीच नव्हे तर  जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला होता. परळी पंचायत समितीचा कारभार यापूर्वी आरोग्य खात्याच्या जागेत चालत होता, आता त्याच जागेवर प्रशस्त व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी स्वतंत्र इमारत उभी राहत असून त्याचे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. ४ कोटी ७६ लाख रुपये प्रशासकीय मान्यता असलेल्या या इमारतीवर आतापर्यंत ३ कोटी ५० लाख ६० हजार इतका खर्च झाला आहे.  २५ हजार स्क्वेअर फूट इतके बांधकाम इमारतीचे झाले आहे. तळमजल्यासह तीन मजली बांधकाम असलेल्या या इमारतीत प्रशस्त मिटींग हाॅल, सभापती – उपसभापती, गटविकास अधिकारी यांचेसाठी स्वतंत्र दालन, सार्वजनिक व महिलांसाठी असे वेगवेगळे स्वच्छतागृह, आमसभेकरिता स्वतंत्र जागा, पाणीपुरवठा, कृषी, पशूसंवर्धन तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारी सर्व विभागाची कार्यालये यात असणार आहेत.
*पंकजाताईंच्या कामाचा झपाटा!*
——————————
पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत गतवर्षी जून महिन्यात झाला होता, केवळ दहाच महिन्यात इमारतीचे पंच्यान्नव टक्के काम झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण विकासाचे सर्व प्रश्न एकाच छताखाली सोडवता यावेत ही गरज ओळखून त्यांनी ही इमारत   मंजूर करून घेतली होती, त्यांच्याच कार्यकाळात इमारत बांधून पूर्ण होत असल्याने त्यांच्या कामाचा झपाटा लक्षात घेण्यासारखा आहे.
●●●

Leave a Reply

Your email address will not be published.