* छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतुळ्यासाठी निधी मंजूर करावा. -शेजुळ*
*माजलगाव / रविकांत उघडे*
दि. २७.०३.२०१८ रोजी झालेल्या जी.प. बीड च्या सर्वसाधारण सभेमध्ये जी.प. बीड च्या नवीन इमारतीच्या दालना मध्ये दर्शनी भागात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी लागणार निधी जी.प. बीड च्या अर्थ संकल्पिय जनरल बॉडीच्या बैठकीत पूर्णाकृती पुतळ्यासाठी लागणार पूर्ण निधी सन २०१८-१९ च्या अर्थ संकल्पामध्ये तरतूद करून पुतळ्यासाठी लागणारा संपूर्ण निधी तात्काळ मंजूर करावा. असा विषय ऐन वेळेच्या विषयामध्ये अध्यक्ष यांचा परवानगीने जी. प. सदस्य चंद्रकांत शेजूळ यांनी मांडला. या विषयावर भरपूर चर्चा होऊन अर्थ संकल्पिय जनरल बॉडीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा देऊन ठराव मंजूर. पुतळा उभारणीस लागणाऱ्या सर्व खर्चास मंजुरी देण्यात आली