Home » मनोरंजन » *गंध फुलांचा*

*गंध फुलांचा*

*गंध फुलांचा*
☆☆☆☆☆
अबोल भाषा डोळ्यातली
ओठांवर तुझ्या हसली
पहाटेच्या गार वा-यासवे
मोग-याच्या सुवासात दरवळली .
प्रीत बसे मोग-याची
अबोलीच्या रंगावर
भलताच फिदा झाला तिच्या
सुहास्य वदनी हसण्यावर.
जाई जुई बावरली
खुदकन गालात हसली
सोनचाफ्याला पाहून तरूवर
वा-यासवे झोके घेऊ लागली.
रजनीगंधा बहरून आली
लग्न-मंडपात सजू लागली.
सुवासाने सगळ्यांना
मदहोश करून गेली..
गुलाब पहा टपोरा
विविध रंगात रंगला.
पाहून सगळ्यांच्या प्रेमात
बेधुंद होऊन गेला.
चंपा चमेलीच्या
गालावर कळी उमलली
पायी तुडवली गेली तरी
फुलांनी उमलण्याची रीत नाही बदलली.
-सौ *अनिता कळसकर*
*कल्याण*

Leave a Reply

Your email address will not be published.