Home » Uncategorized » *मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या*

*मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या*

*मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या*
—————————————-
नाभिक संघटनेचे आष्टी तहसिलदार यांना निवेदन
आँनलाईन डोंगरचा राजा/आष्टी
नाभिक समाजातील आठवीमध्ये  शिकणा-या लहानशा बालिकेस घरासमोरुन अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून  जिवे मारल्याची दुर्दैवी घटना
 दि. 23 मार्च रोजी सकाळी 10 वा. तिचा मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळून आला.
या घटनेचा आष्टी तालुका नाभिक संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला व तहसिदार प्रदिप पांङूळे यांना निवेदन देण्यात आले.
 महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवानी निषेध नोंदवला आता निषेध नोंदवून चालणार नाही अजुन हातगाव कांबी अत्याचार पिडीतेस न्याय मिळाला नाही आरोपीस फाशीची शिक्षा झाली नाही तो खटला अजुन प्रलंबित आहे आणि आता ही दुसरी अत्याचाराची घटना घडली आहे . शासन दरबारी आरोपींविरुद्ध ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी आष्टी तालुका नाभिक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मराठवाडा उपाध्यक्ष अविनाश कदम, प्रविण कदम,श्रीकात शिंदे, बाबु कदम,आजीनाथ गायकवाड, अमोल पवळ, सोमनाथ पवळ बाबासाहेब कदम, दिलीप कदम,प्रसाद गोरे, दिगबर पवळ,ज्ञानदेव पवळ,राजेदृ दळवी,जाँन कदम,अबादास बनकर,बबन कदम,अक्षय कदम,पडित घोडके,दादा कदम, कमलेश मखाना,बाबा दळवी, ठकाराम कदम,विष्णू पवळ,अमोल कदम,सतोष गायकवाड,महेश कदम, शिवम घोडके, रवि गायकवाड आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.