Home » Uncategorized » *प्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापार्‍यांचा एल्गार*

*प्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापार्‍यांचा एल्गार*

*प्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापार्‍यांचा एल्गार*
-व्यापारी महासंघाचे सोहणी, पिंगळे यांचे नेतृत्व.
-हजारो व्यापारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
-काळ्या फिती लावून नोंदविला निषेध.
डोंगरचा राजा आँनलाईन /बीड
राज्यात गुढी पाडव्यापासून राज्य सरकारने संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून या संबंधीचा शासन निर्णयही जारी केला आहे. वास्तविक संपूर्ण प्लास्टिक बंदी झाल्यास याचा दुर्गामी परिणाम होणार असून किराणा व्यापारी, हॉटेल व्यवसायीक, धान्य दुकानदार, स्विट होम, फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, महिला गृह उद्योग, गारमेंट इंडस्ट्रीज, साडी-ड्रेस मटेरिअल आणि स्टेशनरी व कटलरी तसेच बेकरी चालक व्यापार्‍यांसमोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये  तत्काळ सुधारणा करुन व्यापार्‍यांना दिलासा द्यावा या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास जिल्ह्यातील हजारो व्यापार्‍यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी शासनाच्या त्या निर्णयाचा व्यापार्‍यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. विशेष म्हणजे सकाळी 9.00 ते दुपारी 12 पर्यंत व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता. दरम्यान या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी व बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वातच हा मोर्चा यशस्वी झाला.
राज्यात वाढत्या प्लास्टिक कचर्‍यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याने राज्य सरकारने गुढी पाडव्यापासून संपूर्ण राज्यभरात टप्प्या-टप्प्याने संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक शासनाचा हा निर्णय जाचक आणि एकतर्फी असून या बाबत राज्यातील कुठल्याही व्यापारी महासंघाशी साधी चर्चा करण्यात आली नाही की त्यांचे म्हणणेही जाणून घेण्यात आलेले नाही. यापूर्वी राज्य शासनाने 2006 मध्ये असाच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. या दरम्यान 50 मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशवी वापराला सुट दिली होती. मात्र आता एकाच वेळी संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय व्यापार्‍यांच्या आणि ग्राहकांच्या दृष्टीने जाचक असल्याचा आरोप व्यापारी महासंघाने केला आहे. म्हणूनच या जाचक निर्णयाकडे जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचे  लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. 28 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वा. बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने जिल्हा महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्सपासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर सुभाष रोड, भाजी मंडई, बशीरगंज चौक, शिवाजी चौक मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात सहभागी झालेल्या जिल्हाभरातील हजारो व्यापार्‍यांनी काळ्या फिती लावून सरकारने घेतलेल्या संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. सरकारच्या या निर्णयाला व्यापार्‍यांचा का विरोध आहे या संदर्भात सत्यनारायण लाहोटी, संतोष सोहनी, विनोद पिंगळे, संतोष टवाणी, अमित सिकची, विनोद ललवाणी, बाळू सोहनी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर व्यापार्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत सरकारला दिले.
यावेळी बीड नगर पालिकेचे माजी सभापती अमर नाईकवाडे, फारुक पटेल, नगरसेवक शुभम धुत, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे, अरुण बरकसे, संतोष टवाणी, महासचिव सुरज लोहिया, बाळूसेठ सोहनी, मन्मथअप्पा हेरकर, शांतीलाल पटेल, विनोद ललवाणी, अमित सिकची, शकील भाई, नसीरभाई, प्रितेश ललवाणी, कैलास जाजू, प्रमोद निनाल, राजुसेठ तापडीया, दत्तप्रसाद तापडीया, वर्धमान खिंवसरा, राजेश कासट, महेश सिकची, राजेश राठी, नागेश मिटकरी, नंदलाल मानधने, प्रकाश कानगावकर, सुदाम चव्हाण, राजेंद्र मुनोत, संजय बरगे (गेवराई), सुरेंद्र रुपकर, विनायक मुळे (वडवणी), विजयकुमार अंडील (वडवणी), किसनराव माने (वडवणी), संतोष अब्बड (माजलगाव), अनंत रुद्रवार (माजलगाव), धनराज बंब (माजलगाव), सुरेंद्र रेदासणी (माजलगाव), ईश्वर लोहिया (अंबाजोगाई), दत्तप्रसाद लोहिया (अंबाजोगाई), दामोदर भांगडीया (अंबाजोगाई) यांच्यासह जिल्हातील हजारो व्यापार्‍यांनी मोर्चात सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.