Home » माझी वडवणी » *रेल्वे मावेजा प्रश्न शरद पवार मार्फत थेट दिल्लीत गेला.*

*रेल्वे मावेजा प्रश्न शरद पवार मार्फत थेट दिल्लीत गेला.*

*रेल्वे मावेजा प्रश्न शरद पवार मार्फत थेट दिल्लीत गेला.*
* माजी कृषीमंत्री शरद पवारांना प्रकाश सोळंके भेटले.
* रेल्वे भुसंपादन मावेजा कृती समितीचे निवेदन.
* लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक.
============================
*आँनलाईन / डोंगरचा राजा*
     अहमदनगर ,बीड ,परळी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीला ११०० रु  ते १३०० रु प्रति गुंठा या प्रमाणे अत्यल्प मावेजा दिला असुन या जमिनीला एकरी ५० लाख रुपये मावेजा देण्यात यावा.व या कामी ज्या शेतक-यांच्या संपुर्ण जमिनी गेल्या अशा भुमिहीन शेतक-यांच्या मुलांना रेल्वे विभागात नौकरी देण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना माजी महसुल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे भुसंपादन मावेजा कृती समितीचे निवेदन नुकतेच देण्यात आले. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी थेट संपर्क साधुन या कामी लक्ष वेधण्याचे कळविले आहे.श्री.गोयल यांनी लवकरच यावर निर्णय घेऊ असे सांगितले
अहमदनगर ,बीड ,परळी रेल्वे मार्ग शेतक-यांच्या जीवावर उठला असुन निजामकालीन मावेजा देऊन  रेल्वेकरीता वड़वणी तालुक्यातील लाख मोलाची जमीन शासनाने संपादीत केली आहे.बाजारभावा प्रमाणे मावेजा मिळावा या करिता गत चार वर्षा पासुन येथील शेतकरी संघर्ष करीत आहेत. शासन दखल घेत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. मावेजाकरिता संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.बाजार भावा प्रमाणे मावेजा मिळावा याकरिता वड़वणी तालुक्यातील शेतकरी संघटीत झाले व माजी महसुल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे भुसंपादन मावेजा कृती समिती स्थापन करून कांही दिवसापुर्वीच काम बंद आंदोलन छेडण्यात आले. सदर निवेदन जिल्हाधिकारी बीड़ यांना देखील देण्यात आले
अहमदनगर ,बीड़ ,परळी रेल्वे मार्गकरिता बळजबरीने संपादित केलेल्या जमीनीचा बाजारभावा प्रमाणे मावेजा मिळावा म्हणून गत चार वर्षापासून  शासन -प्रशासनाचे उबंरठे झिझवले. शासन दखल घेत नसल्याने मावेजा मिळावा याकरिता संघर्ष करणारे शेतकरी मनोहर लक्ष्मण पतंगे या शेतकऱ्याचा धास्तीने ह्हय विकाराच्या झटका येऊन निधन झाले. या मनोहर तात्याचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत म्हणून  वड़वणी तालुक्यातील वड़वणी. बाहेगव्हाण. मोरवड़. पुसरा. बाबी. उपळी. लोणवळ. तसेच तेलगाव. कोथींबीरवाड़ी. भोपा येथील शेतकरी संघटीत झाले. दिनांक 19 मार्च 2018 रोजी माजी महसुल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मार्गांवर कामबंद आंदोलन केले. आता नाही तर कधीच नाही. शासना सोबत शेवटची निर्णायक लढाई लढण्याकरीता शेतकरी जिवावर उदार झाले.
     अहमदनगर ,बीड ,परळी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीला ११०० रु  ते १३०० रु प्रति गुंठा या प्रमाणे अत्यल्प मावेजा दिला असुन या जमिनीला एकरी ५० लाख रुपये मावेजा देण्यात यावा.व या कामी ज्या शेतक-यांच्या संपुर्ण जमिनी गेल्या अशा भुमिहीन शेतक-यांच्या मुलांना रेल्वे विभागात नौकरी देण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना माजी महसुल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे भुसंपादन मावेजा कृती समितीच्या वतीने नुकतेच देण्यात आले.असुन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी थेट संपर्क साधुन या कामी लक्ष वेधण्याचे कळविले आहे.श्री.गोयल यांनी लवकरच यावर निर्णय घेऊ असे सांगितले असुन श्री.पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार असल्याचे समजते.त्यामुळे वडवणी तालुक्यातील रेल्वे मावेजा प्रश्न थेट दिल्लीत गेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.