आमिरचं मराठीत ‘तुफान आलंया’
आमिर मराठी कार्यक्रमात झळकणार
डोंगरचा राजा ऑनलाइन |
आमिर खान
आपल्या पाणी फाऊंडेशनचे कार्य व महत्त्व महाराष्ट्रातील अगदी खेड्यापाड्यात दूरवर पोहोचावे यासाठी आमिर खानने विविध मार्गांनी प्रयत्न केले. अनेकदा मनोरंजनातूनही सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न त्याने केला. जल संधारणाचे हेच काम पुढे नेत आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर मराठी कार्यक्रमात झळकणार आहे. ‘तुफान आलंया’ या मराठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तो करणार आहे.
राज्यातील पाण्यासंदर्भातील परिस्थितीशी संबंधित हा कार्यक्रम असून यामध्ये मराठी कलाकार आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती येऊन प्रेरणादायी कथा सांगणार आहेत. आठवड्यातून एकदा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ३१ मार्चपासून झी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार असल्याची माहिती आमिरची पत्नी किरण रावने जागतिक जल दिनी (२२ मार्च) दिली.