*वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन*
*(केज मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन याचा लाभ घ्यावाः जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा*)
*अंबाजोगाई(प्रतिनिधी*):मतदार संघातील शेतकरी बांधवासाठी वसुंधरा सेवा प्रतिष्ठान हे सतत विविध शेतीसाठी उपयोगी असणारे उप्रकम राबविण्यात येतात,दि.२९/०३/२०१८,रोजी प्रतिष्ठानच्यावतीने माजी आरोग्य राज्यमंत्री स्व डॉ.विमलताई मुंदडा यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त सकाळी १०:०० ते ५:००वाजेपर्यंत भव्य रेशीम शेती उद्योग मार्गदर्शन व रेशीम शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे,हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे,तरी या सोहळ्यासाठी केज मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा केली आहे.
या कार्यक्रमाला उद् घाटक म्हणुन माजी न्यायमुर्ती मुंबई तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई श्री अंबादासराव जोशी यांची उपस्थिती असणार आहे,तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मराठवाड्यातील रेशीम शेतीचे प्रणेते श्री.लकुळ बाबुराव कदम,नागपुर तसेच शेतकरी बांधवाना रेशीम उद्योगाचे महत्व पटवुन देण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपसंचालक प्रा.रेशीम बोर्ड औरंगाबाद येथीलश्री दिलीप हाके,तसेच प्रा.प्राणीशास्त्र विभाग (रेशीम उद्योग)शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरराष्ट्रीय रेशीम सल्लागार क्युबा,सदस्य महाराष्ट्र जैवविविधता मंडळ मुंबईचे डॉ. आधिकराव जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणुन माती तपासणी व प्रयोगशाळा केंद्र नागपुर येथील डॉ. त्रिलोक हजारे,माजी रेशीम विकस अधिकारी,वरिष्ठ शास्त्रज्ञ केंद्रीय रेशीम बोर्ड,औरंगाबाद,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हस्तकला,कोल्हापूर येथील प्रियंका जाधव,यांचीही प्रमूख उपस्थिती असणार आहे,प्रमुख पाहुणे म्हणुन मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहीया,ज्ञानप्रबोधिनी चे अध्यक्ष प्रसाद चिक्षे,ट्रेनिंग प्रोव्हाडर सचिन थोरात यांचीही उपस्थिती असणार आहे.
हा कार्यक्रम दिनांक २९/०३/२०१९,गुरुवार रोजी वसुंधरा प्राथमिक विद्यालय,सायली लाँन्सजवळ,बीड रोड येथे होणार आहे,तरी केज मतदार संघातील सर्व जनतेनी,तरुणांईनी,शेतकरी,बांधवां नी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,व कार्यक्रमाची शोभा वाढवावी,अशी विनंती जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,प्र.रेशीम विकास अधिकारी,भगवानराव सातदिवे,युवा नेते अक्षय मुंदडा,सौ.नमिताताई मुंदडा,वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेले आहे