Home » Uncategorized » मंत्रालयाकड़े आगेकूच  विद्यार्थी व युवकांच्या मोर्च्यावर पोलिसांचा सौम्य लाठीमार

मंत्रालयाकड़े आगेकूच  विद्यार्थी व युवकांच्या मोर्च्यावर पोलिसांचा सौम्य लाठीमार

मंत्रालयाकड़े आगेकूच  विद्यार्थी व युवकांच्या मोर्च्यावर पोलिसांचा सौम्य लाठीमार
मुख्यमंत्र्यांशी मागण्यासंदर्भात शिष्टमंडळाची सकारत्मक चर्चा
‘डीवायएफआय’ व ‘एसएफआय’ चा आज 23 मार्च रोजी मंत्रालयावर
शिक्षण आणि नोकरीसाठी युवक विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडवून सोम्य लाठीमार केला.यावेळी विद्यार्थी,युवक,कार्यकर्त्यांनाची व पोलिसांची मोठी धरपकड झाली.यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन जवळपास एक तास रस्त्यावर ठिया मांडला.यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला चर्चेला बोलवल्या नंतर मोर्च्या आझाद मैदानात हलवण्यात आला.यानंतर आझाद मैदानात सभा भरवण्यात आली.
       नोकर भरतीवरील बंदी उठवा.पद कपात करणे थांबवा. कंत्राटी पद्धती बंद करा. शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा. सर्व शाळा – महाविद्यालयात मुलभूत सुविधा पुरवा. खाजगी शैक्षणिक संस्थांमधील फी वाढीवर निर्बंध घाला. शिक्षण हक्क कायद्यानुसार मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या २५ टक्के आरक्षणाची सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी करा. आयटीआय विद्यार्थांना रु.२५०० प्रती महिना स्टायफंड द्या व त्यांचे इतर सर्व प्रश्न मार्गी लावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाची बंद केलीली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा. सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीमध्ये महागाईनुसार वाढ करा. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करा. ईबीसी सवलतीची प्रभावी अंमलबजावणी करा. कुटुंबातील एका व्यक्तीकडे असलेले जातीचे प्रमाणपत्र संपूर्ण कुटुंबाकरिता ग्राह्य मानण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह इतर बऱ्याच महत्वपूर्ण मागण्याना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.
      यावेळी मोर्चाला पाठिंबा किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे,आ.जे.पी.गावित यांनी दिला व एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव विक्रम सिंह व डीवायएफआयचे राष्ट्रीय महासचिव अभय मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले.ह्या मोर्च्याचे नेतृत्व एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव विक्रम सिंह, डीवायएफआयचे राष्ट्रीय महासचिव अभय मुखर्जी,एसएफआयचे राज्यअध्यक्ष मोहन जाधव,राज्यसचिव बालाजी कलेटवाड,डीवायएफआयचे राज्यअध्यक्ष सुनील धनवा,राज्यसचिव प्रिति शेखर,अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.यावेळी हजारो विद्यार्थी,युवक व कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.