पत्रकार कल्याण निधीचा मान महिला सरपंचाला
मराठी पत्रकार परिषदेच्या मदतीच्या आवाहनला प्रतिसाद
—-
बीड ः प्रतिनिधी
जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना संकट काळात तातडीने आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने पत्रकार कल्याण निधी ही संकल्प राबविण्यात सुरवात करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकर निधीसाठी शनिवारी सकाळी मदतीचे आवाहान केल्यांनतर काही तासात खंडाळा येथील महिला सरपंच स्मिता मोहन चौरे यांनी कल्याण निधीच्या खत्यावर पाचशे एकावन्न रूपये टाकून मदतीचा पहिला मान मिळविला आहे. शनिवारपासून या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पत्रकार बांधवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत जेमतेम असते. अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांवर काही संकट ओढवल्यास आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना विविध आडचणींचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार कल्याण निधी उभारण्यास सुरूवात करण्यात आली आहे. परिषदेच्या पदाधिकारी यांनी शुक्रवारी दि. 23 मार्च रोजी पत्रकार कल्याण निधी जमा करण्यासाठी महाराष्ट्र बँकेत खाते उघडले आहे. या खात्यावर सर्व पत्रकरांबरोबरच समाजातील विविध घटकातील व्यक्तीने जमेल तशी आर्थिक मदत करावयाची आहे. शुक्रवारी खाते उघडल्यानंतर मराठी परिषदेच्या वतीने शनिवारी सोशल मिडीयाच्या माध्यामातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. आवघ्या काही तासात या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील खंडाळा येथील महिला सरपंच स्मिता मोहन चौरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतःच्या बँके खात्यावरून ऑनलाईन पध्दतीने पत्रकार कल्याण निधीच्या खात्यावर पाचशे एकावन्न रूपये ट्रान्सफर केले आहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आवाहन केल्यांनतर सर्वात आगोदर स्मिता यांनीच पैसे टाकून मदत करण्याचा पहिला मान मिळवाला आहे. खंडाळा येथील महिला सरपंच स्मिता मोहन चौरे या नेहमीच गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकर घेत असतात. पालकमंत्री पंकजा मुंंडे यांच्याकडून अस्मिता योजनेसाठी निधी उभारण्याचे आवाहन केल्यांनतर सर्वात आगोदर स्मिता चौरे यांनीच आर्थिक मदत केली होती. पत्रकार परिषदेच्या आवाहनाला ही त्यांनी प्रतिसाद देवून मदतीचे सुरवात केली असल्याने पत्रकार बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत.
——–