* पंचायत समितीत भ्रष्टाचा-यांची पाठराखण *
च पाठराखण*
डोंगरचा राजा आँनलाईन / वडवणी
वडवणी पंचायतसमितीमधुन करण्यात येत आसलेल्या रोहयोच्या कामात आजपर्यंत मोठ्या प्रमाणात भृष्टाचार झालेला आसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत व येत आहेत परंतु यामध्ये आधिकारी, कर्मचारी या सर्वांचेच हात ओले झालेले आसल्याने तक्रारीवर कुठलिही कार्यवाही नकरता उलट हे संगनमताने भृष्टाचारालाच अभय देत आसल्याचे दिसुन येत आहे. राजा हरिश्चंद्र पिंपरी येथील रोहयोच्या कामाची चौकशी करण्याचे गटविकासाधिकार्यानी लेखी आदेश देऊनही केवळ भृष्टाचाराला पाठिशी घालत विस्ताराधिकारी व शाखा अभियंता यांनी गटविकासाधिकार्याच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली आहे.
तालुक्यातील आनेक गावातील रोहयो ( नरेगा ) अंतर्गत करण्यात आलेली कामे बोगस वकागदोपत्रीच करण्यात आलेले आसुन याकामी पंचायत समितीच्या आधिकार्या पासुन ते कर्मचार्या पर्यंत सर्वांचेच हात ओले झालेले आसल्याने आलेल्या तक्रारी मार्गी लावल्या जात नसुन यावर गावपातळीवर किंवा पंचायत समितीच्या पातळीवर काहीतरी तडजोड करुनच तक्रारी दडपवल्या जात आहेत. आजपर्यंत पंचायत समिती कडून एकाही तक्रारीची पुर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली ळआसल्याचे उदाहरण ऐकावयास मिळत नाही.
तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी येथे रोहयो अंतर्गत 2014 ते 2017 या कालावधीत करण्यात आलेल्या रोहयोच्या ( नरेगाच्या ) कामामध्ये मोठ्या प्रमाणात भृष्टाचार झालेला आसुन प्रत्येक्ष कामे न करता कागदोपत्री कामे दाखवून अपहार केलेला आसल्याची लेखी तक्रार श्री नामदेव ज्ञानोब शिंदे व ईतर यांनी दि. 11 जानेवारी रोजी वडवणी पंचायत समितीकडे दाखल करुन सदरिल भृष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी याद्वारे करण्यात आलेली आहे . परंतु केवळ भृष्टाचार दडपण्यासाठीच तब्बल दोन महिने गटविकासाधिकार्यानी याबाबत गांभीर्यपूर्वक घेतलेच नाही शेवटी तक्रारदारांच्या पाठपुराव्यामुळे गटविकासाधिकार्यानी ता . 7 मार्च रोजी शाखा अभियंता श्री गालफाडे व विस्ताराधिकारी राउत यांना सदर तक्रारीवरून हरिश्चंद्र पिंपरी येथील रोहयोच्या कामाची सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी दिलेले आहेत परंतु सात दिवसापेक्षा दुप्पट कालावधी जाउनही यावर अद्याप चौकशी नकरता गटविकासाधिकार्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. चौकशी केली उडवाउडवीची उत्तरे ऐकावयास मिळत आहेत.
*अधिकाऱ्यांची दिरंगाई *
” आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत परंतु अर्जदाराने ही चौकशी जिल्हा पातळीरुन व्हावी आसा अर्ज केल्यामुळे चौकशी झालेली नाही ती करण्यासाठी सांतो- श्री मिलिंद पोहरे, गटविकास अधिकारी प.स.वडवणी.
” आम्ही ही चौकशी कोठुन व्हावी आसा आर्ज कुठेही दिलेला नाही तर चौकशी दाबून ठेवण्यासाठी आहे
नामदेव शिंदे
तक्रारदार ह.पिंप्री
*अभियंता नाही*
” सदरिल चौकशिचे आदेश दिलेले आहेत परंतु त्यासाठी शाखा अभियंता उपस्थित नसल्यामुळे व त्यांच्याशी संपर्कही होउ शकत नसल्याने चौकशी करण्यात आलेली नाही –
राउत डी.डी.
विस्ताराधिकारी प.स.वडवणी