Home » Uncategorized » किरण गित्ते अॅॅकॅडमी  विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर मोठे यश !  किरण गित्ते इन्स्टीट्युटचा सईम डबीर हा बीड जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी 

किरण गित्ते अॅॅकॅडमी  विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर मोठे यश !  किरण गित्ते इन्स्टीट्युटचा सईम डबीर हा बीड जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी 

किरण गित्ते अॅॅकॅडमी  विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर मोठे यश !
किरण गित्ते इन्स्टीट्युटचा सईम डबीर हा बीड जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी 

     परळी(प्रतिनिधी)- विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी अंतर्गत चालत असलेल्या किरण गित्ते इन्स्टीट्युट परळी-वैजनाथ येथे I.I.T.  NEET प्रीफाउंडेशन कोर्स घेण्यात येत आहेत.राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षा(NTSE) राष्ट्रीय पातळीवर भारतभर घेण्यात येते.किरण गित्तेइन्स्टीट्युट मध्ये इयत्ता १० वीत शिकत असलेला सईम डबीर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा(National Talent Search Examination) २०१७-२०१८ यामध्ये ११०.१२ मार्क घेऊन राष्ट्रीय पातळीवर २७९ वा क्रमांक मिळवला. बीड जिल्ह्यामधून असे यश संपादन करणारा किरण गित्तेइन्स्टीट्युटचा विद्यार्थी सईम डबीर हा एकमेव विद्यार्थी आहे.  इयत्ता ८ वी चा विद्यार्थी पार्थ रेवणवार हा न ̌शनल सायन्स ओलम्पियाड (NSO) परीक्षेत आंतरराष्ट्रीय पातळीवर ६७४ वा क्रमांक पटकावला तसेच पवनकुमार नागभूषण फुलारीवर्ग ९ वी या विद्यार्थ्याने न ̌शनल सायन्स ओलम्पियाड (NSO) या परीक्षेत आंतरराष्ट्रीय पातळीवर ४४३६ वा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विवेकानंद युथ वेल्फेयर सोसायटीचे प्रेरणास्थान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त किरण गित्ते व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांनी  शुभेच्छा दिल्या व अशाच प्रकारे विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी परळी तसेच परिसरातील गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील असा मानस व्यक्त केला.
यांच्या या यशाबद्दल किरण गित्ते इन्स्टीट्युट च्या वतीने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण गित्ते इन्स्टीट्युट चे डायरेक्टर प्रमोद पांडे सर, दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूलचे मुख्याध्यापक तेजशकुमार सर व सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये किरण गित्ते इन्स्टीट्युट चे शिक्षक गोयल सर, तपेश सर, विक्रम सर, शर्मा म ̌डम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरणकुमार गित्ते यांनी केले आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.