Home » Uncategorized » काश्मीर: अनंतनागमध्ये २ दहशतवाद्यांचा खातमा

काश्मीर: अनंतनागमध्ये २ दहशतवाद्यांचा खातमा

काश्मीर: अनंतनागमध्ये २ दहशतवाद्यांचा खातमा

2 terrorists killed in an encounter in j&k's anantnag

काश्मीर: अनंतनागमध्ये २ दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगर: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत ‘हिजबुल मुजाहिदीन’चे दोन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून एके ४७ रायफलींसह मोठ्या प्रमाणावर दारूगोळा व शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत.

‘हिजबुल’चे दोन दहशतवादी अनंतनागमधील डोरू परिसरात लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना शुक्रवारी रात्री मिळाली. त्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलीस व सीआरपीएफनं संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. सर्वप्रथम डोरू परिसराला संपूर्ण वेढा घालण्यात आला. कसलीही अफवा पसरू नये म्हणून अनंतनाग जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली. ही शोधमोहीम सुरू असतानाच डोरू भागातील एका घरातून जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी मारले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published.