Home » ब्रेकिंग न्यूज » औरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा

औरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा

औरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा

नमाजनंतर दुपारी 3 वाजता आमखास मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली.

डोंगरचा राजा ऑनलाइन | औरंगाबाद

 ‘शरियत मेरी जान है’ अशी उर्दू भाषेतील पट्टी कपाळावर बांधलेली. ‘हुकूमत अपना काम करे इस्लाम को ना बदनाम करे. इस्लाम का जो दस्तुर है, वह हमको मंजूर है.तलाक बिल एक सजीश है.’ असे विविध फलक हातात घेऊन मुस्लिम महिला ट्रिपल तलाक बिला विरोधात औरंगाबाद शहरातील आमखास मैदानात जमल्या होत्या. मुस्लीम समाजाच्या ‘शरियत’मध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्यांनी त्या विरोधात आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढला. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.

शुक्रवारच्या विशेष नमाजनंतर दुपारी 3 वाजता आमखास मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा मोर्चा काढण्यात आला होता. ट्रिपल तलाक विरोधात करण्यात आलेला हा कायदा शरियत मध्ये ढवळा ढवळ आहे.शरियत आमची ओळख असून त्यासाठी आम्ही जीव देखील द्यायला तयार आहोत. शरियतचा जो नियम आहे. तो आम्हाला मान्य आहे. सरकारला मुस्लिम समाजासाठी खरोखरच काही करायचं असेल तर शिक्षण, आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. असं मत यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published.