Home » Uncategorized » *अस्मिता योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा.  मुख्यअधिकारी येडगे यांचे आवाहन*

*अस्मिता योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा.  मुख्यअधिकारी येडगे यांचे आवाहन*

*अस्मिता योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा.
मुख्यअधिकारी येडगे यांचे आवाहन*
बीड,दि.24(प्रतिनिधी)ः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यात अस्मिता योजनेचा शुभारंभ झाला असून राज्य शासनाने ग्रामीण महिलांसाठी तसेच जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील मुलींसाठी माफक दरांमध्ये सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्याची योजना दि.8 मार्च 2018 सुरू झाली आहे. सॅनिटरी नॅपकीनच्या वापराची जाणीव जागृती व्हावी यासाठी 450 मुलींना ‘पॅडमॅन’ चित्रपट दि.24 मार्च 2018 रोजी बीड चित्रपटगृहात दाखविण्यात आला. यावेळी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उमेद अभियानच्या राज्य व्यवस्थापक श्रीमती वैशाली ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अस्मिता योजना राबविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्तुत्य असून ग्रामिण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्येसॅनिटरी नॅपकीनचा वापर व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणिव जागृती होईल. ग्रामिण भागात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत महिला कर्मचार्‍यांनी तसेच शालेय विद्यार्थीनींनी या संदर्भात पुढाकार घेऊन वैयक्तिक स्वच्छता आणि सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत प्रचार व प्रसार करावा. जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींसाठी ही योजना असून अनुदान तत्वावर राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा. जिल्हा परिषद शाळांमधील मुलींकडे अस्मिता कार्ड असणे आवश्यक आहे. सर्व मुलींच्या यादीची प्रत मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात प्रत्येक शाळेेने जमा करावी. शाळेतील सर्व पात्र मुलींची नोंदणी आपली सेवा केंद्राच्या केंद्र प्रमुखांनी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन करावी. यासाठी मुलींकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. याकरीता प्रत्येक मुलींच्या नोंदणीकरीता रुपये 5 प्रमाणे नोंदणी फी शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. नोंदणी झालेल्या सर्व मुलींसाठी यश बँक मार्फत अस्मिता कार्ड तयार करण्यात येतील व उमेद मार्फत जिल्हा परिषद शाळेत पोहचविण्यात येतील. याबाबत सर्व संबंधित घटकांनी गांभिर्याने दखल घेऊन प्रयत्न करावेत असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद माध्य. शाळा पिंपळनेर, पाली, ताडसोन्ना, चौसाळा, कन्या प्रशाला बीड, जि.प.माध्यमिक शाळा, बीडच्या विद्यार्थीनींनी प्रातनिधीक स्वरुपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या

Leave a Reply

Your email address will not be published.