Home » Uncategorized » *बॉम्बशोधक श्वान ‘चॅम्प’ बीड पोलीस दलात दाखल.*

*बॉम्बशोधक श्वान ‘चॅम्प’ बीड पोलीस दलात दाखल.*

बॉम्बशोधक श्वान ‘चॅम्प’ बीड पोलीस दलात दाखल..
डोंगरचा राजा /आँनलाईन
बीड : जिल्ह्यातील श्वान पथक येथील श्वान चॅम्प व त्याची देखभाल करणारे कर्मचारी यांनी मध्य प्रदेशातील राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्र, सिमा सुरक्षा बल या ठिकाणी सहा महिन्याचे श्वान प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करून त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.
श्वान चॅम्प याने बॅच क्रमांक १८४ मध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे. असा दर्जा मिळविणारा ‘चॅम्प’ हा महाराष्ट्रात पहिलाच श्वान ठरला आहे. याकामी चॅम्पची देखभाल करणारे पोलीस कर्मचारी बी.एच.तुपे आणि आर.के.जगताप यांनी विशेष लक्ष देवून श्वानास उत्कृष्ठ प्रशिक्षण देण्यात अतिशय मेहनत घेतली व उत्कृष्ठ कामगिरी बजावली. यापुढे श्वान चॅम्प हा बीड जिल्हा पोलीस दलामध्ये स्फोटक शोधक म्हणुन कामकाज पाहणार आहे. यानिमित्ताने पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधिक्षक (गृह) सावंत, पोलीस उप अधिक्षक बीड, सुधिर खिरडकर राखीव पोलीस निरिक्षक शेख, बीडीडीएस येथील सपोनि सय्यद व श्वान पथक येथील पोउपनि चांदेकर, रापोउपनि चव्हाण, सावरे यांनी सदर श्वान व दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.