Home » Uncategorized » एल्गार मोर्चास जिल्ह्यातून  हजारो  कार्यकर्ते जाणार -अनिल डोंगरे

एल्गार मोर्चास जिल्ह्यातून  हजारो  कार्यकर्ते जाणार -अनिल डोंगरे

एल्गार मोर्चास जिल्ह्यातून  हजारो  कार्यकर्ते जाणार – अनिल डोंगरे

बीड,दि.23(प्रतिनिधी):-

भिमा कोरेगाव येथे हिंसाचार घडवून आणणार्‍या मनोहर भिडेच्या अटकेसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रश्‍ना संदर्भात भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.26) मार्च रोजी मुंबई विधानभवनावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या एल्गार मोर्चास बीड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती भारिप बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी दिली आहे.

    प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, सनातन विचार सरणीच्या सरकारने बहूजन वर्गाचे वाटोळे करून टाकले आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले आहे, अद्यापही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्याचबरोबर भिमा कोरेगाव घटनेतील हिंसाचार घडवून आणणारा सनातन विचारसरणीचा कट्टरवादी मनोहर भिडे याला देखिल  सरकारने अद्यापही अटक केलेली नाही. त्यामुळे मुंबई विधानभवनावर 26 मार्च रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

         तरी या एल्गार मोर्चास जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते अन्यायाच्या विरोधात विधानभवनावर धडकणार आहेत , अशी माहिती भारिपचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, महासचिव प्रा. प्रमोद बागडे,संघटक ज्ञानेश्वर कवठेकर, युवक जील्हा आध्यक्ष संतोष, जोगदंड सरचिटणीस राहुल वडमारे,कोषाध्यक्ष एस.ए. सोनवने,आशोक मगर,रुपेश बोराडे,प्रदीप तुरुकमाने, चरनराज वाघमारे,आजय सरवदे,आजय साबळे, आकाश साबळे,परमेश्वर लांडगे,संजय गवळी, बाळासाहेब कीरवले, रवींद्र पाटोळे,सचिन मेघडंबर इंजि. प्रशांत उघडे, आश्विन टाकणखार,संदीप फंदे मारोती सरवदे,राम सरवदे,धम्मानंद वाघमारे,  किशोर भोले,अशोक भोले, बाबासाहेब मस्के,अशोक गायकवाड, चंद्रकांत औसरमल यांनी दिली असून या एल्गार मोर्चास भारिप तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने जाणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.