Home » Uncategorized » *शासनाने कडधान्य खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत- आ. क्षीरसागर*

*शासनाने कडधान्य खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत- आ. क्षीरसागर*

*शासनाने कडधान्य खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत- आ. क्षीरसागर*

 

आँनलाईन /डोंगरचा राजा

मुंबई दि.22 (प्रतिनिधी):- गेल्या वर्षीच्या हंगामात राज्यात कडधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून *राज्य सरकारकडून धान्य खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचा माल पडून आहे.* योग्य भाव आणि तातडीची खरेदी न केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून सरकारने धान्य खरेदी केंद्रे तातडीने चालू करावीत असा प्रश्‍न आ.जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभेत उपस्थित करून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला आहे. *सन 2017-18 च्या हंगामात राज्यात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून यामध्ये तूर आणि हरभरा पिकाचे अधिक उत्पादन आहे.* राज्यात साडे अठरा लाख टन तूर उत्पादन झाली असून यामध्ये केवळ 27% तूर खरेदी झाली असून बाकी तूर आजही शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. इतर राज्यात खरेदी केंद्रे सुरू होवून कडधान्य उत्पादनाला सबसिडी दिली जाते शेजारील  कर्नाटक राज्यात हरभरा पिकाला 500 रूपये सबसिडी दिली जाते. शेतकर्‍यांकरिता कर्नाटकात वेगळा आणि महाराष्ट्रात वेगळा नियम कशासाठी. राज्यात हरभरा केंद्र तातडीने सुरू केल्यास शेतकर्‍यांचे अर्थीक नुकसान होणार नाही. नाफेड कडून केवळ 27% खरेदी केली जाते बाकीच्या शेतकर्‍यांनी काय करायचे? असा प्रश्‍न उपस्थित करून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी सरकारकडून शेतकर्‍यांना सापत्न वागणूक दिली जाते. आधारधूत किंमतीत आणि बाजार भाव किंमतीत मोठा फ रक असून सध्या तूर आणि हरभरा विक्रीसाठी शेतकर्‍यांचे हाल सुरू आहेत. सरकारने जी धान्य खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत असा प्रश्‍न उपस्थित करून सरकारने शेतकर्‍यांचा असंतोष ओडून घेवू नये. *सरकार केवळ अच्छे दिनची घोषणा करीत असून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर विश्‍वामीत्री भूमिका घेत असल्याचा आरोप आ.क्षीरसागर यांनी विधानसभेत केला.*

 

Leave a Reply

Your email address will not be published.