Home » Uncategorized » *विमलताईंच्या आठवणीने अनेकजण गहिवरले*

*विमलताईंच्या आठवणीने अनेकजण गहिवरले*

*विमलताईंच्या आठवणीने अनेकजण गहिवरले*

विमलताईंच्या समाधीस्थळावर मान्यवरांकडून पुष्पांजली अर्पण..

अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्री कै. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त चनई परिसरातील त्यांच्या समाधीस्थळावर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या आठवणींना अनेकांकडून उजाळा मिळाला.केज विधानसभा मतदार संघात आपल्या कार्यकर्तृत्ववाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माणकरणाऱ्या डॉ. विमलताई मुंदडा यांचे अकाली निधन झाले. आज त्यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्ताने शहर व परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता त्यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा, शेख रहिम शेख रज्जाक, मधुकर काजगुंडे, सारंग पुजारी, शेख ताहेर, दिनेश भराडिया, शेख खलिल, ज्ञानेश्वर चौरे, बालाजी पाथरकर, वैजेनाथ देशमुख, वळीराम चोपणे, बबलु सिद्दीकी, अमोल पवार, अनंत आरसुडे, गोपाळ मस्के, दीपक सुरवसे, नूर पटेल, बालासाहेब शेप, शेख जावेद, खलील मौलाना, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published.