Home » Uncategorized » राज्यातली पहिली कारवाई; औरंगाबादच्या प्रकरणात भ्रष्ट शेळकेवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई 

राज्यातली पहिली कारवाई; औरंगाबादच्या प्रकरणात भ्रष्ट शेळकेवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई 

राज्यातली पहिली कारवाई; औरंगाबादच्या प्रकरणात भ्रष्ट शेळकेवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई

बीड /आँनलाईन डोंगरचा राजा

– २०१४ मध्ये औरंगाबादेतील ५०० एकर वर्ग १ ची शेतमजमीन वर्ग २ करण्याची परवानगी देत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा तेथील तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी तथा बीडचे विद्यमान पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांच्यावर राज्य शासनाने सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली आहे. राज्यात प्रथमच राजपत्रित अधिकार्‍यावर शासनाकडून एवढी मोठी कारवाई केल्याची घटना दिसून येते. विद्यमान पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांच्या भ्रष्ट कारभाराचा पापाचा घडा अखेर आज बीडमध्ये फुटला. २०१४ साली शेळके हे औरंगाबादेत निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यावेळी औरंगाबादेतील ५०० एकर वर्ग १ ची शेतजमीन भ्रष्ट मार्गाने वर्ग २ ची करण्याबाबत परवानगी दिली. या प्रकरणात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले. तशी तक्रारही राज्य शासनाकडे गेली. शासन, प्रशासन व्यवस्थेने या प्रकरणात सखोल चौकशी करून शेळके यांना तेव्हा निलंबितही केले. परंतु नंतर कायद्याच्या पळवाटा शोधत शेळके हे बीडला पुरवठा अधिकारी म्हणून आले, मात्र इथेही त्यांच्या भ्रष्ट लिला सुरुच राहिल्या. अखेर या प्रकरणात आ. सतीश चव्हाण आणि आ. अमरसिंह पंडित यांनी लक्ष घालत भ्रष्ट अधिकार्‍याला सेवेत ठेवायचच कशाला? असा जाब विधान परिषदेमध्ये विचारण्यात येत गेला. अखेर २० तारखेला राज्याच्या उपसचिवांनी सक्तीच्या सेवानिवृत्तीचे आदेश काढले. ते आदेश औरंगाबादचे उपआयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शेळके यांना बजावले. या आदेशात शेळके यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीचा आदेश काढण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.