Home » Uncategorized » *तुर,सोयाबीन,उडीदच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव…*

*तुर,सोयाबीन,उडीदच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव…*

*तुर,सोयाबीन,उडीदच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव…*

 

आँनलाईन /डोंगरचा राजा

* भाव नसल्याने राष्ट्रवादी, काँग्रेसचे आमदार आक्रमक…*

*सरकार शेतकऱ्यांना अजून किती नागवणार आहे ?- आ. तटकरे*

 

मुंबई दि. २२ मार्च – शेतक-यांच्या तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे चुकीचे हमीभाव धोरण,  सरकारची  उदासीनता यामुळे हे भाव  कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तुर,सोयाबीन,उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने विधानपरिषदेचे कामकाज काही काळासाठी तहकुब करण्यात आले. तुरीला ५४५० हमीभाव असताना शेतकऱ्यांना चार हजारच्यावर भाव मिळत नाही.त्यामुळे शेतकर्यांवचे क्विंटलला दीड हजारांचे नुकसान होत आहे.  राज्यात १ लाख १५ हेक्टरवर तूरीचे उत्पादन अपेक्षित आहे. शासनाने ४४.६ लक्ष क्विंटल तूर खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. नाफेडने दिलेल्या आकडेवारीनुसार १६ मार्च २०१८ अखेर केवळ १२.२ लाख क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. फक्त २७ टक्के उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. ४८ दिवस आता संपलेले आहेत. उरलेल्या ४२ दिवसात ७२.७ टक्के खरेदी शासनाला करायची आहे. मात्र शासकीय गोदामात जागा नाही. ऑनलाईन प्रक्रियेचा गोंधळ चालू आहे. शासनाने एकूण उत्पनांपैकी दहा टक्के ही तूर खरेदी केलेली नाही. कमीत कमी तूर घ्यावी असा सरकारचा डाव आहे. कर्नाटक राज्य हमीभावावर ५०० रुपये बोनस देत असताना राज्यात हमीभावाने तरी तूर खरेदी करा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. हरभराचीही तीच परिस्थिती आहे. ४ हजार ४०० भाव असताना केवळ ३२०० ते ३५०० रूपये भाव मिळतो. हरभऱ्याचीही खरेदी केली जात नाही. आज वीज कनेक्शन तोडले जात आहेत. कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नाही, गारपीटग्रस्तांनाही मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत आज कडधान्याचा उत्पादकही अडचणीत आला आहे. त्यामुळे या गंभीर विषयावर चर्चा करावी अशी मागणी स्थगन प्रस्ताव मांडून केली.प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी ही सरकारवर जोरदार हल्ला चढवतांना निवडणुकीपूर्वी या सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत दिली जाईल,अशी घोषणा केली होती. तूर, सोयाबीन, हरभरा, उडीद आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे.कडधान्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्याने शेतकऱ्यांना ५ हजार कोटींचा फटका बसणार असल्याचे शेतकरी स्वाभिमान मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले आहे. नाफेडची सरकारी खरेदी याला जबाबदार असल्याचा आरोप तिवारी यांनी केला असल्याचे सांगितले.

सरकार शेतकऱ्यांना अजून किती नागवणार आहे, त्यांची किती ससेहोलपट करणार आहे? कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आत्महत्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच जात आहेत. वीज कनेक्शन, कृषी पंप तोडले जात आहेत. सरकारने यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सरकारने नेमलेल्या मिशनचे किशोर तिवारी यांनी सरकारला घरचा आहेर दिला असताना यावर सभागृहात चर्चा होणे आवश्यक असून तातडीने चर्चा झाली पाहिजे. अशी मागणी केली. यावर सभागृह 2 वेळा तहकुब झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.