* “ताई” पेढा घ्या ! *
डोंगरचा राजा / आँनलाईन
तुमच्यामुळे आमची सेवानिवृत्ती टळली”.
’31मार्चला सेवानिवृत्त होत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी पंकजाताईंना पेढे भरवून काढले भावोद्गार’
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी, नुकतेच अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय 65 वर्षे करून संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या, माण जिल्हा सातारा येथील, सेवानिवृत्तिच्या उंबरठ्यावरील, छाया परशुराम शिपटे व अन्य 64 अंगणवाडी सेविकांनी आज ‘रॉयलस्टोन’ निवासस्थानी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पेढे वाटून त्यांचे आभार मानले.
कोणतीही संघटना किंवा राजकारणाच्या पलीकडील सेविकांच्या निरागस प्रेमाने सुखावलेल्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना चांगली सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.