Home » Uncategorized » *आ.पवार, विरोधी पक्षनेते मुंडेंमुळे अंगणवाडीताईंचा प्रश्न मार्गी -दिलीप भोसले*

*आ.पवार, विरोधी पक्षनेते मुंडेंमुळे अंगणवाडीताईंचा प्रश्न मार्गी -दिलीप भोसले*

*आ.पवार, विरोधी पक्षनेते मुंडेंमुळे अंगणवाडीताईंचा प्रश्न मार्गी -दिलीप भोसले*

 

बीड /आँनलाईन डोंगरचा राजा

 

 

राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांना दिलेल्या सापत्न वागणुकीच्या विरोधात विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार अजित पवार व विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार विरोध करुन सभागृह अंगणवाडीताईच्या प्रश्नावरुन हालवून सोडले. म्हणूनच अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या संपाच्या काळातील मागण्या मान्य झाल्या व मेस्मा कायद्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. आमदार अजित पवार, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे अंगणवाडीताईंचा प्रश्न मार्गी लागला असून संघटनेच्या वतीने त्यांचे जाहिर आभार व्यक्त करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य संघर्ष अंगणवाडी सेविका, मदतनिस कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी म्हटले आहे.

अंगणवाडी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग द्या व त्यांना शासकीय सेवेत घेण्याची मागणीसाठी संघटनेने वारंवार केलेल्या आंदोलन, मोर्चा केली व सर्व पक्षांच्या आमदार, खासदारांच्या भेटी घेऊन त्यांना हा प्रश्न विधीमंडळात मांडण्याची विनंती केली. त्याचेच यश म्हणून राज्य विधीमंडळात इतिहासात प्रथमच अंगणवाडीताईंच्या मागण्यांसाठी जोर धरण्यात आला. याचे सर्व श्रेय संघटनेला जाते. सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वरुन 65 वर्षे केले. राज्य सरकार 60 व्या वर्षी कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती देते. अंगणवाडी कर्मचार्‍यांना 65 व्या वर्षी फिटनेस कसा राहू शकतो. हे कर्मचारी 60 वर्षानंतर अनफिट असल्याच्या नावाखाली घरी बसवण्यात येतील हा सरकारचा कुटील डाव असून हा डाव हाणून पाडण्यासाठी तसेच  65 वर्षावरुन 60 वर्ष वय निवृत्तीचे करावे व कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घेऊन  त्यांना सर्व लाभ देण्यात यावे यासाठी संघटना हायकोर्टात जाणार दिलीप भोसले यांनी सांगितले आहे. आमदार अजित पवार, धनंजय मुंडे यांचे संघटनेच्या वतीने अनिल समुद्रे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संघमित्रा शेजवळ, चांगुणा वडमारे, अर्चना सोळंके, शेख सलीमा, नंदा उघडे, शिवकन्या स्वामी, निलाबाई घोडके, कल्पना कांबळे, अनिता सरवदे, कविता जाधव, सविता वीर, रोजमेरी पॉलकेदारे,  माया खवतड, संजिवनी ठोंबरे, सुनंदा काळे, ललिता आडाणे, कांता सरवदे, लता मस्के, राधा कल्याणकर, नागराणी कळमकर, सुवर्णमाला जोशी, धोंडुबाई तौळ, प्रतिभाताई कावळे, छाया सावंत, अनिता लेंडाळ, अनिता मराठे, उषा चव्हाण, सिंधु ढगे, कमल कुडके, स्वप्ना वाघमारे, शेख मल्लिका, सत्यशिला वाघमारे, वत्सला वाघ, सुनंदा शिंदे, संगीता जाधव, सुनिता गायकवाड, उषा देशपांडे, कौशल्या सोनवणे, राणी जाले, अनुजा गायकवाड, शेळके रत्नमाला, गितांजली भोसले, रत्नमाला शेळके, सुमन आंधळे तसेच अंगणवाडीताई यांनी आभार मानले आहेत.

—————-

Leave a Reply

Your email address will not be published.