Home » Uncategorized » *शासकीय योजनेच्या कर्जासाठी बसपा चे धरणे आंदोलन*

*शासकीय योजनेच्या कर्जासाठी बसपा चे धरणे आंदोलन*

*शासकीय योजनेच्या कर्जासाठी बसपा चे धरणे आंदोलन*

माजलगाव-/ रविकांत उघडे

गरजु व बेरोजगारांना स्वालंबी करण्या उद्देशाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध महामंडळे व शासकीय योजना च्या माध्यमातून दिले जाणारे कर्जे प्रकरणे बँकेत दाखल झाले आहेत पण बँकेचे व्यवस्थापण ती प्रकरणे मंजूर करीत नाही मंजूर करण्यात यावेत म्हणून बसपाच्या माजलगाव शाखेच्या वतीने 21मार्च रोजी एसबीआय बँके समोर लाक्षणिक धरणे आंदोलनकेले आहे.
याविषयी संबंधित बँकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले विकास मंडळ, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, संतरोहीदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळ,अपंग महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक महामंडळ, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ,अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच समाज कल्याण, मुद्रा योजना,यांच्या माध्यमातून कर्ज फाईल्स दाखल करण्यात आल्या होत्या त्या मंजूरीसाठी बँकेकडे वर्ग करण्यात आल्या आहेत परंतु व्यवस्थापक मंजुरी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले.
याचे नेतृत्व बसपाचे माजलगाव विधानसभा अध्यक्ष एडव्होकेट अमोल डोंगरे यांनी केले होते आणि जि.के.मिसाळ, बी.एस.लक्ष्मी शिंदे , सत्यपाल डोंगरे, मनोज साळवे ,प्रकाश साळवे, शेख युसुफ ,राजेश आव्हाड, वैशाली साळवे, आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.